⁠  ⁠

पुणे जिल्हा सत्र न्यायालयात ‘सफाईगार’ पदाच्या २४ जागा ; पगार १५ ते ४७ हजारापर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. पुणे जिल्हा न्यायालयमध्ये सफाईगार पदाच्या एकूण २४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या, अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२१ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : २४

पदाचे नाव : सफाईगार

शैक्षणिक पात्रता : प्रकृतीने सुदृढ असावा

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

वेतनश्रेणी :
सातव्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस १ या सुधारित वेतन संरचनेत रुपये १५,००० ते ४७,६००/- व नियमानुसार देय भत्ते.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा न्यायालय पुणे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १५ जून २०२१

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

कामाचे स्वरूप :

निवड झालेल्या उमेदवारास जिल्हा न्यायीक विभागांतर्गत कोणत्याही न्यायालयात “सफाईगार” या पदावर नियुक्ती दिली जाईल. नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या इमारतीतील व निवासस्थानातील प्रसाधनगृहांची, इमारतींची व परिसरांची नियमित स्वच्छता व साफ सफाई करणे, निगा राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडावी लागतील. तसेच अशा उमेदवारांनी न्यायालयाच्या आवारातील जागेची निगा राखणे कामी आवश्यक ती सर्व कामे करावी लागतील. सफाईगार हे पद एकाकी असून, पदोन्नतीची संधी उपलब्ध नाही. याबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

उमेदवारांना सूचना :

१. जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या त्या विभाग कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेवूनच अर्ज करावा, अशी परवानगी मुलाखतीच्या वेळी सादर करावी. उमेदवारांनी आपले अर्ज आपापल्या विभाग कार्यालय प्रमुखामार्फत पाठविण्याची आवश्यकता नाही.

२. उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा किंवा इतर गैरमार्गाचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरविण्यात येईल. या बाबतीत निवड समितीचा निर्णय अंतीम राहिल.

३. अर्जाचा नमुना व सोबतच्या प्रमाणपत्रांचे नमुने जिल्हा न्यायालय, संकेतस्थळ https://districts.ecourts.gov.in/pune यावर उपलब्ध त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे सादर करावीत. आहेत.

४. उमेदवाराने अन्य कोणतेही प्रमाणपत्र अथवा प्रमाणपत्रांच्या प्रती अर्जास जोडू नयेत.

५. उमेदवाराने त्याचे/तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (फोटो) अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी की त्यातील काही भाग छायाचित्रावर आणि अर्जावर सुध्दा येईल.

६. उमेदवाराने दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत. तसेच त्याचे विरुध्द कुठल्याही न्यायालयात कुठलाही फौजदारी खटला निकाली / चालू किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणित करावे असल्यास त्याचा तपशिल दयावा.

७. विहित नमुन्यात नसलेला आणि अपुर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविणेत येईल.

८. सफाईगारांच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास योग्य ते निकष लावुन पुढील प्रक्रियेकरिता उमेदवारांची लघुसूची तयार करण्याचे अधिकार सल्लागार समितीस राहतील व त्यांचा निर्णय अंतिम राहिल व अशी तयार केलेली लघुसूची जिल्हा न्यायालय, पुणे येथील सुचना फलक व
https://districts.ecourts.gov.in/pune या संकेतस्थळावर प्रसिध्द
करेल.

९. सफाईगार पदासाठी लघुसूचीत नमुद उमेदवारांची २० गुणांची चापल्य व साफसफाई कामाचे मुल्यमापन परीक्षा घेण्यात येईल

१०. सफाईगार पदासाठी चापल्य व साफसफाई कामाचे मुल्यमापन परिक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची २० गुणाची तोडी मुलाखत घेण्यात येईल.

११. उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता, परिक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्वखर्चाने हजर रहावे लागेल.

१२. सेवाप्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रक व अन्य महत्वाची सुचना असल्यास त्याची माहिती जिल्हा न्यायालयाच्या सुचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. परंतु तो बदल वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही.

१३. वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परिक्षेचा दाखला आवश्यक राहिल.

महत्वाची सूचना :
१. “नोंदणी क्रमांक” हा अर्जातील रकाना कार्यालयाद्वारे भरण्यात येईल.
२. अर्जाचा नमुना जिल्हा न्यायालय, पुणेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याप्रमाणेच असावा.
३. प्रतिक्षा यादी प्रसिध्द झाल्यापासून ती फक्त ०२ वर्षाच्या कालावधीपर्यंत वैध राहिल.
४. ओळखपत्र असल्याशिवाय चापल्य परिक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास परवानगी मिळणार नाही.
५. उमेदवाराने स्वतः चा पुर्ण पत्ता पिनकोडसह, भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी (असल्यास) लिहिलेला व २५ रुपयांचे पोस्टाचे तिकीट चिकटवलेला लिफाफा स्वत चा पत्ता लिहिलेल्या आर.पी.ए.डी. व्या पोहोच पावतीसह अर्जासोबत जोडावा.
६. उमेदवाराने त्याचे/तिथे एक जादा पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (फोटो) अवत
७. १९ या वाढता प्रार्दुभावामुळे निवड प्रक्रियेने पुढील वेळापत्रक (लघुमुचीनी या कागदपत्र पडताळणी नापल्य व साफसफाईची परिक्षा इत्यादी) नंतर वरील समुद्र तर सर्व न्यायालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीर करण्यात येईल.

Share This Article