⁠  ⁠

शेतकऱ्याचा मुलाची UPSC परीक्षेत बाजी ; वाचा विनयच्या यशाची गोष्ट

Chetan Patil
By Chetan Patil Add a Comment 1 Min Read
1 Min Read

UPSC Success Story : आपल्याकडे कोणत्याही सोयीसुविधा नसल्या की आपण तक्रार करतो. पण गावातील शिक्षण… आर्थिक परिस्थिती बेताची…खडतर प्रवास करूनही शेतकरी कुटुंबातील विनय पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत यश मिळविले आहे.

निळवंडी (ता. दिंडोरी) येथील रहिवासी…शेतकरी असलेले वडील सुनील पाटील आणि गृहिणी आई सुचिता पाटील आहेत.विनयने चौथीपर्यंतचे शिक्षण दिंडोरीला जिल्‍हा परिषद शाळेत घेतले. यानंतर माध्यमिक शिक्षण तालुका पातळीवरील जनता इंग्‍लिश स्‍कूल येथून पूर्ण केले.

पुढे केटीएचएम महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील शिक्षण घेतले. नंतर, कृषी शाखेतूनच पदवी शिक्षण घेतले. तिसऱ्या प्रयत्‍नात तो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यशस्‍वी झाला आहे.त्याने तयारीसाठी दिल्‍ली गाठली; परंतु कोरोनाचा काळ असल्‍याने तो महिना‍भरात घरी परतला. शेतात अभ्यास करून त्‍याने तिसऱ्या प्रयत्‍नात यश मिळविले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत देशभरातील १०१६ उमेदवारांना यश मिळाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ज्या उमेदवारांना यश मिळाले आहेत त्यापैकी एक नाशिकमधील शेतकरी पूत्र विनय पाटील.

Share This Article
Leave a comment