⁠  ⁠

तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेमध्ये होणार 19000 पदांसाठी महाभरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Railway Bharti 2024 : रेल्वेमध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या भरतीसाठी मोठी घोषणा केली आहे.एएलपी (Assistant Loco Pilot) भरती प्रक्रिया १ आठवड्यात पूर्ण करावी, अशा सूचना रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांना दिली आहे.

रेल्वेत एएलपी पदांच्या भरतीची संख्या वाढवली आहे. याअंतर्गत १८,७९९ लोको पायलटची भरती करण्यात येणार आहे. याआधी ५६९८ असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती होत होती. लोको पायलटचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये कांचनगंगा ट्रेन दुर्घटनेनंतर ही दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाचे संचालक विद्याधर शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.

रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन चालवण्याची ड्युटी नऊ तासांची असते. मात्र, रेल्वेकडे लोको पायलटची कमतरता असल्याचे लोको पायलटला १०-१२ तास ड्युटी करावी लागते. तसेच अनेक लोको पायलट १२-२६ तास ट्रेन चालवतात. त्यामुळे रेल्वे अपघात होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

Share This Article