रेल्वेत ‘असिस्टंट लोको पायलट’ पदाच्या 5696 जागांसाठी मेगाभरती जाहीर
Railway Bharti 2024 भारतीय रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी गुडन्यूज आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 20 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 5696
विभागनिहाय रिक्त जागा :
अहमदाबाद – 238
अजमेर – 228
बेंगळुरू – 473
भोपाळ – 284
भुवनेश्वर – 280
बिलासपूर- 1316
चंदीगड – 66
चेन्नई – 148
गोरखपूर – 43
गुवाहाटी- 62
जम्मू श्रीनगर – 39
कोलकाता – 345
मालदा – 217
मुंबई – 547
मुझफ्फरपूर – 38
पाटणा – 38
प्रयागराज – 652
रांची – 153
सिकंदराबाद – 758
सिलीगुडी – 67
तिरुवनंतपुरम – 70
रिक्त पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारांना फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ/टीव्ही), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिकल (डिझेल), हीट टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिकच्या ट्रेडमध्ये इंजिनचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष तर कमाल 30 वर्ष असायला हवे. राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सवलत देण्यात येईल.
परीक्षा फी : सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना फक्त 250 रुपये शुल्क भरावे लागेल.
पगार : 19,900/- ते 63, 200/- (स्तर-2) या वेतनश्रेणीनुसार पगार असेल
निवड कशी केली जाईल?
कम्प्यूटर बेस्ड टेस्ट -1 (CBT)
कम्प्यूटर बेस्ड टेस्ट -2 (CBT)
कम्प्यूटर बेस्ड एप्टीट्यूड टेस्ट (CBAT)
डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन
मेडिकल टेस्ट
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.rrcb.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा