राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 मार्च च्या अनुषंगाने करावयाची तयारी आणि रिविजन
(तसे म्हणाल तर या सर्व गोष्टी आपणास माहीत आहेत परंतु एक शेवटची उजळणी म्हणून)
मनाविरुद्ध का होईना जो एक्स्ट्रा आठवडा मिळालेला आहे त्याचा जो सदुपयोग करेल आणि या आठवड्यात अभ्यासात ढिला नाही पडणार तेच विद्यार्थी यशस्वी होतील राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा पूर्ण कस जोखला आहे.
प्रथमता विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी यावर आपण बोलू..
1.याकाळात विद्यार्थ्यांनी स्वतःला quarantine करूनच अभ्यास करावा, म्हणजे किमान कॉन्टॅक्ट इतर दुनियेशी ठेवावे याचा फायदा अभ्यासासाठीही होईल, निगेटिव्ह व्यक्ती आपल्यापासून दूर राहतील आणि करोना चा संसर्ग व्हायची भीती ही दूर राहील.
2.परीक्षेच्या दिवशी ज्या तयारी करायचे आहेत जसे हॉल तिकीट काढणे पेन पेन्सिल अजून काही वस्तू ज्या लागणार आहेत त्या सर्व 1-2 दिवसांमध्येच आणून ठेवाव्यात.
3.आपण आपल्या घरून पुन्हा परीक्षेच्या ठिकाणी प्रवास करणार असाल तर प्रवास कशा पद्धतीने करणार आहोत इतर लोकांना किमान रित्या भेटणार आहोत ,संबंध येणार आहेत ते पहावे.
4. परीक्षा केंद्राच्या जिल्ह्यात आपले नातेवाईक, मित्र परिवार यांना परीक्षा झाल्या नंतरच भेटावे परीक्षेच्या आधी किती मित्रप्रेम आले तरी भेटू नये तसेच फिरायचे असेल तरी परीक्षा नंतरच म्हणजे परीक्षा सोडून इतर सर्व गोष्टी या 21 मार्च नंतरच करणार या मतावर निर्णयावर ठाम राहून तसेच वागा.
रिविजन संदर्भात परीक्षा सात दिवसांवर आलेली आहे आपण आपले शंभर टक्के देणे अपेक्षित आहे दिवसाच्या चोवीस तासांपैकी किमान 14 तास अभ्यास होणे अपेक्षित आहे यामध्ये किमान 8-9तास पेपर-1GS आणि 4-5 तास CSAT या पद्धतीने रिविजन करावी.
14 मार्च- सुरुवात आपण त्यातल्या त्यात सर्वात सोपा आणि कमी मार्कस ला विचारला जाणारा सब्जेक्ट म्हणजे पर्यावरण या पासुन सुरुवात करु, जैवविविधता त्याचे संवर्धन, प्रदूषण नियंत्रण कायदे, नजीकच्या काळातील हवामानातील बदल, वनधोरण, वनसंपदा, प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने तसेच CSAT मध्ये उतारे आणि त्यावरील प्रश्न
15 मार्च- Geography हा विषय पर्यावरणाला पूरक असा आहे तसेच 14 मार्च ऐवजी पंधरा ला जरी रिविजन स्टार्ट केले तरी आपण दोन्ही विषय कव्हर करू शकतो यामध्ये एका दिवसात जर रिविजन करायचे असेल तर नकाशा न वरून fast अभ्यास होऊ शकतो तसेच प्राकृतिक भूगोल मधील संज्ञा/ Definations पहाव्यात. जलप्रणाली, उद्योगधंदे, खनिजे याविषयी तक्ते- टेबल्स पहावे. नदी, शिखरे यांची लांबी उंची तसेच लक्षात न राहणाऱ्या आकडेमोड लक्षात ठेवाव्यात, या विषया मधील फॅक्च्युअल डाटा याचा अभ्यास करावा. CSAT मध्ये उतारे आणि त्यावरील प्रश्न
16 मार्च- History हा विषय एका दिवसात करण्यासाठी सर्वात किचकट आहे 2019, 20, 21, 22 यावर्षी कोणत्या घटनांना 100-150 वर्ष पूर्ण होत आहेत त्या अभ्यासावा. समाज सुधारक यांनीच महाराष्ट्राचा इतिहास बऱ्यापैकी व्यापलेला आहे त्यामुळे महत्त्वाचे म्हणजे ज्या समाजसुधारकांचा 75,100,150 वर्ष पूर्ण होत आहे अशा समाजसुधारकांचा अभ्यास प्रथम करावा. जन्म-मृत्यू, महत्वाचे कार्य, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांच्या संघटना, कोण कोणास काय म्हंटले, तसेच समाजसुधारकांच्या एकमेकातील गुंफण याचा अभ्यास करावा.CSAT मध्ये निर्णय क्षमता या विषया वरील प्रश्न सोडवावे
17 मार्च- Polity अभ्यास केला तर सर्वात सोपा विषय. महत्त्वाच्या कलमे, मूलभूत हक्क, घटना दुरुस्ती, महत्त्वाच्या केसेस यांचा अभ्यास करावा. तसेच नजीकच्या काळात झालेल्या घटना दुरुस्ती बदल हेही अभ्यासावे,
अलीकडील काळात केंद्राने केलेली काही महत्त्वाची कायदे नजरेखालून घालावेत दादरा नगर हवेली विलीनीकरण, नागरिकत्व सुधारणा, जम्मू-काश्मीर पुनर्रचना, ग्राहक संरक्षण इत्यादी. CSAT मध्ये उतारे आणि त्यावरील प्रश्न
18मार्च- G. science यामध्ये biology यासाठी शरीरातील प्राण्यांमधील आणि वनस्पतींमधील सिस्टिम्स त्यामधील अवयव त्यांचे कार्य झालेले बदलअवयवांचे वजन आणि इतर गोष्टी लक्षात ठेवाव्यात chemistry मध्ये रासायनिक संज्ञा मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म रासायनिक प्रक्रिया physics मध्ये महत्वाच्या संज्ञा बदल यांचा अभ्यास करावा CSAT मध्ये MCQ सोडवावे.
19 मार्च- Economics यामध्ये factual data अभ्यासावा तसेच नजीकच्या काळात घडलेल्या आर्थिक घडामोडी, झालेले बदल, महत्त्वाच्या संज्ञा CSAT मध्ये MCQ सोडवावे.
20 मार्च- या शेवटच्या दिवसात आपला राहिलेला विषय अथवा अवघड जाणारा विषय तसेच आपणास महत्त्वाचा वाटणारा घटक याचा अभ्यास करावा.CSAT जो विभाग अवघड जात आहे त्याचा अभ्यास करावा.
-डॉ. अनिरुद्ध क्षीरसागर