Rajyaseva 2022 Master Plan
नमस्कार गेले पूर्ण वर्ष खूप अडचणीचं आणि अस्थिरतेच होतं. अनेक अनेक वेळा परीक्षा पुढे ढकलल्या जाणं आजूबाजूला भीतीचे वातावरण यामुळे स्पर्धा परीक्षा त्यातल्या त्यात एमपीएससी चा अभ्यास करण प्रत्येकालाच कठीण गेल असेल. पण आता सुवर्णसंधी आहे राज्यसेवा परीक्षा अवघ्या 70 दिवसांवर येऊन ठेपली आहे.आता या सुवर्णसंधीचं सोनं करावं की राखरांगोळी करावी हे आपल्या पुढील 70 दिवसांच्या अभ्यासावर ठरेल. जीव तोडून अभ्यास करा परीक्षेत काय होईल त्याचा आतापासून विचार करून दबावात येऊ नका आणि स्वतःला खुल्या मनाने अभ्यास करण्यासाठी मोकळं करा.
या लेखापासून नवीन मालिका मिशन एमपीएससी टीम तुमच्यासाठी सुरू करत आहे आपल्या या वेबसाईटचा उद्देश मदत मार्गदर्शन आणि मेहनत आहे त्यामुळे 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थीना प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या अडचणीत मदत मिळावी यासाठी ही लेखमालिका सुरू करत आहोत. अगदी परीक्षेच्या दिवसापर्यंत या माध्यमातून तुमच्या सोबत राहू व मार्गदर्शन करू.
मागील अनेक पूर्वपरीक्षांच्या विश्लेषणानंतर आम्ही एक फॉर्म्युला तयार केला, आहे त्यात आपल्या आकलना नुसार बदल करून उपयोगात आणावा पण त्याआधी विद्यार्थी नेमक्या काय चुका करतात त्या बघुयात :
जेव्हा विविध परीक्षांचा निकाल लागतो तेव्हा ते अनेक यशस्वी अधिकाऱ्यांचा इंटरव्यू बघतात व त्यांच्या Booklist सरसकट Copy करतात व पुस्तकांत अधिक भर घालतात असे करत करत ते एक दिवस इतके Confuse होतात की शेवटच्या काही दिवसात ज्यांना “GOLDEN DAY’S” म्हणतात त्यात विद्यार्थी गोंधळून जातात. या समस्येवर सोपा उपाय म्हणजे MINIMUM BOOKS,MAXIMUM REVISION, SUCCESSFUL RESULTS. या प्रकारच्या अनेक विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीचा अंदाज आम्हाला आहे, त्यामुळे हा लेख व यापुढील सर्व लेख, हे एका व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून नसून हे मागील सर्व पूर्व परीक्षा व तसेच ज्यांनी या परीक्षेत यश मिळवले त्यांचे अनुभव, चुका यावरून तयार केले जाणार आहेत.
खालील ६ महत्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण अभ्यासाला कशी सुरुवात करावी ते एक थोडक्यात पाहूया :
(1) पूर्वपरीक्षा आणि SYLLABUS
कोणत्याही परीक्षेचा आवाका काय? हे Syllabus वरुनच आपल्याला कळते. आयोगाने आपल्याला पूर्व परीक्षेचा Syllabus काही वाक्यांत दिला आहे. पण आपण एक अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असल्याने, आयोगाने जरी अगदी संक्षिप्त Syllabus दिलेला असला तरी आपण आपला स्वत :चा एक Box (Syllabus) तयार करु शकतो. बॉक्सचा फायदा असा की : प्रत्येक विषयाचा एक बॉक्स असल्यास त्यात, त्या विषयासंबंधीचे सर्व टॉपीक असतील, तर ते आपल्याला Study करतांना खूप सोपे होईल.
पुढील पॉईंटमध्ये या बॉक्स बद्दल चर्चा केल्यावर तुमचा विश्वास बसेल की तो कसा पुर्णपणे Authentic असेल आणि तो तुम्ही कसा स्वत: तयार कराल.
हो हे इतके सोपे आहे.
(2) PYQ : Previous Year Question Paper Analysis : या घटकाचा उपयोग पूर्व परीक्षेच्या अभ्यासात कसा करावा?
MPSC – UPSC करणारा प्रत्येक विद्यार्थी या प्रक्रियेतून कधीतरी जातोच त्याला PYQ करावेच लागते. त्याला काही वेगळा पर्याय नाही. हे प्रत्येकालाच करणे आहे, पण आज विचार केला तर परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. त्यामुळे आपण या पूर्व परीक्षेसाठी दुसरा पर्याय उरतो तो म्हणजे बाजारात उपलब्ध एक उत्तम पूर्व परीक्षा Analysis पुस्तक निवडणे.
1) वरील पुस्तकात विषयानुसार आधीच वर्गीकरण असेल, आपल्याला फक्त याचे Topics नुसार वर्गीकरण करायचे आहे.
2) या केलेल्या वर्गीकरणाच्या Topics मध्ये ज्या वर्षात जास्त प्रश्न असतील त्यानुसार बघीतल्यास आपण एक बॉक्स तयार करु शकतो.
याप्रकारे प्रत्येक विषयाबद्दल जर आपण असच follow केल तर आपण प्रत्येक विषयाला एक बॉक्स करु शकतो. आपल्याला पुढील Journey मध्ये या बॉक्स चा खूप जास्त फायदा होईल.
या Analysis वरून आपण जर मागील ५ वर्षांचे विश्लेषण केले तर आपल्याला Syllabus Box (स्वत: चा Syllabus)साठीचे Topics मिळतील. या मुळे कमी वेळेत तुम्ही सर्व महत्व पूर्ण topics कव्हर करू शकणार आहात.
(3) Notes काढणे
हो, या परीक्षेत स्वतः जवळ NOTES असणे खूप गरजेचे आहे. या नोट्स आपल्याला परीक्षा जसजशी जवळ येते, शेवटचे 30 दिवस उरतात तेव्हा अगदी कमी वेळेत शॉर्ट REVISION साठी फायद्याच्या असतात पण आपण काही सर्व विषयाच्या सर्व टॉपीक च्या नोट्स काढू शकत नाही आणि तसे तूर्तास गरजेचे सुद्धा नाही.
कोणत्या टॉपिक्स नोट्स काढायचा व त्या कशा काढतात हे आपण विषयानुसार पुढील लेखांमध्ये बघूयात. अजून एक पॉईंट म्हणजे आपण येथे थोडे SMARTWORK करू शकतो जसे की NOTES स्वतःच्या असणे फायदेशीर व चांगली गोष्ट आहेच पण जर तुम्हाला अशा नोटा भेटतं असतील ज्या अगदी पर्याप्त आहेत व त्यातून तुम्हाला हवे असलेले TOPICS आणि Questions Cover होत आहेत तर तसा वापर करू शकतो या प्रकारे आपण अभ्यास करतोच पण त्यासोबतच आपण आपला महत्त्वाचा वेळ वाचवू शकतो.
(4) पुस्तकांची निवड व Book List
हा पॉईंट आपण वेगळ्या पद्धतीन बघू. यामध्ये आपण Booklist चे महत्व न बघता विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात व ते कोठे चूक करतात किंवा काय करु शकतात याचा विचार करु.
आपल्याला माहित आहे. MPSC चा Final निकाल लागल्यावर नविन अधिकार्यांच्या बुक लिस्ट येतात व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुकलिस्ट चेंज होत जातात व दर महिन्यात त्यात अनेक Books ची भर पडते. पण पूर्व परीक्षासाठी आपल्याला अशा एका विषयाला 3-4 Books असून चालत नाही. त्यामुळे बुक लिस्टची निवड एक सोप्या पद्धतीने होऊ शकते.
1) मागील परीक्षांत आलेले सर्व टॉपीक्स या पुस्तकातून Cover होतोय का?
2) हे पुस्तक वाचून प्रश्न सोडवले तर मला त्या प्रश्ना विषयीची माहिती व नेमके उत्तरे या पुस्तकात भेटतात का ?
वरील गोष्ट लक्षात घेतल्या कि यातून तुम्हला प्रत्येक विषयासाठी पुस्तक मिळेल. आता फक्त एका विषयासाठी 1-2 पुस्तक असाव म्हणजे अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा Revision साठी अडचण होणार नाही. आपण विषयानुसारच्या पुढील लेखांमध्ये प्रत्येक विषयासाठी काही पुस्तकांचे पर्याय सुचवू.
(5) MCQ प्रश्नसंच व सराव
हे Explain करण्याआधी तुमच्यासाठी ही बाब समजणे महत्वाचे आहे कि : ही परीक्षा जास्तीत जास्त पुस्तक Read करण्यासाठीची आहे की MCQ Solve करण्यासाठीची !
तर ही परीक्षा MCQ ची आहे. थोड व्यावहारिक विचार करा. अभ्यास करायचाच आहे आणि तो महत्वाचा आहे. पण त्यासोबतच MCQ चा सराव करणे पण तितकेच आवश्यक आहे. MCQs च अजून एक महत्व, ते म्हणजे आपण केलेला अभ्यास किती समजला, ते लक्षात येईल.
त्यामुळेच 2022 च्या पूर्व परीक्षेसाठी आतापासून रोज 100 MCQ Solve करणे गरजेचे आहे. आपल्या दिवसातील एकूण अभ्यासाच्या वेळेपैकी 20 टक्के टाईम MCQ सरावासाठी राखीव ठेवणे ही आता या परीक्षेची गरज आहे, असे समजावे.
(6) Revision आवश्यक
Revision चा तुमच्या अभ्यासात व परीक्षा पास होण्यासाठी दोन पद्धतीने उपयोग होतो.
A) ही परीक्षा M.C.Q. आधारित असल्याने तुम्हाला जितके कन्सेप्ट क्लिअर असणे गरजेचे आहे तितकेच फॅक्ट लक्षात राहणं सुद्धा गरजेचे आहे आणि ते आपण फक्त रट्टा मारून हे करू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला तो टॉपिक पुन्हा पुन्हा वाचून आपल्या डोक्यात उतरून घेतलेला असायला पाहिजे. तुम्ही बरेच वेळा असे विद्यार्थी बघितले असतील ज्यांना प्रश्न विचारल्यास क्षणाचीही वाट न बघता त्यांचे उत्तर तयार असते. याचे एकमेव कारण म्हणजे एखादा Topic पुन्हा पुन्हा वाचत राहतात म्हणजे त्या गोष्टीचे नियोजन करतात आणि प्रत्येक विषयाच्या या नियोजनानुसार अनेक रिविजन करतात, या परीक्षेचा अभ्यास न संपणारा आहे म्हणून प्रत्येक विषयाच्या अनेक रीविजन करणे गरजेचे होते.
B) स्पर्धा परीक्षा जशी तुमच्या अभ्यासाची परीक्षा असते त्याच प्रमाणे ती तुमच्या डिसिजन मेकिंग आणि निगेशन टेक्निक चेक करण्याची सुद्धा परीक्षा असते त्यामुळे अनेकानेक रेविजनस असतील तर तो विद्यार्थी जरी एखाद्या प्रश्नाचे डायरेक्ट उत्तर काढू शकत नसला तरी रिविजन मुळे तो त्या प्रश्नातील अनेक इतर पर्याय बाजूला करून उत्तरा पर्यंत सहज पोहचू शकतो.
C) रिविजन साठी तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पर्धा परीक्षेतील आपल्याला मिळणारा कमी वेळ, स्पर्धा परीक्षांसाठी एक महत्त्वाचे आणि मोठे आव्हान म्हणजे टाईम हे सुद्धा आहे. काही परीक्षेत आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ कमी मिळतो आणि अशाच ठिकाणी जर आपल्या अनेक रिविजन असतील आणि आपल्याला बर्याच गोष्टी पाठ असतील ज्या की आपण रिविजन मुळे लक्षात राहिलेल्या असतात त्यामुळे आपल्याला अनेक प्रश्नांचे उत्तर वेळ न घालवता व जास्त विचार न करता देता येतात आणि आपला वेळ वाचून तो आपण इतर प्रश्नांना सहज देऊ शकतो.
0-7-30
या Strategy मध्ये ‘0’ म्हणजे आपण त्या दिवशी वाचलेला टॉपीकची रात्री किंवा पुढील एक दिवसात अगदी Quick Revision. त्यानंतर ‘7’ म्हणजे तोच टॉपीक सात दिवसानंतर पुन्हा एकदा Revise करणे व पुढे ‘30’ म्हणजे पुन्हा तो टॉपीक 30 दिवसानंतर त्याच पद्धतीने पुन्हा Read करुन संपवणे. यामुळे तो Topic तुमचा अगदी पक्का होईल. याप्रमाणे सर्व Topic चे तुम्ही तुमच्या Convenience नुसार Plan करु शकतात व तुमच्या Schedule मध्ये Revision हा Point Add कल्यास तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल.
धन्यवाद, आम्ही सुरवात केली आणि Mission Rajyaseva हा उपक्रम तुमच्यासाठी सुरु केला. आता तुमची वेळ आहे. मेहनत घ्यायची, वरील Points चा उपयोग तुमच्या अभ्यासात करा व आपल्या अभ्यासाचे Perfect नियोजन करा. येत्या काही दिवसात एक Perfect Strategy आणि हो लवकरच आपण या पुढाचे म्हणजे असेच Subject wise विश्लेषण प्रत्येक विषयानुसार पुढील लेख-सिरीज मध्ये देणार आहोत.
गुड लक – शुभेच्छा.
टीम मिशन एमपीएससी