RBI मार्फत 450 जागांसाठी भरती ; पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी..
RBI Assistant Bharti 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. RBI ने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार आरबीआयच्या www.rbi.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे. RBI Assistant Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 450
पदाचे नाव: असिस्टंट (सहाय्यक)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) (ii) संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 20 ते 28 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]
वेतनश्रेणी:
सुरुवातीचा मूळ पगार 20,700/- प्रति महिना असेल. यानंतर वेतनश्रेणी 20700 – 1200 (3) – 24300 – 1440 (4) – 30060 – 1920 (6) – 41580 – 2080 (2) – 45740 – 2370 (3) – 52850 – 2500 – 2500 (250) वर्षे असेल. ). आणि इतर भत्ते जसे की DA, TA इ.
निवड प्रक्रिया
उमेदवारांना तीन ऑनलाइन परीक्षा द्याव्या लागतील. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT).
परीक्षा नमुना
प्राथमिक परीक्षा 100 गुणांच्या 100 प्रश्नांसह एक तासाची असेल.
यामध्ये इंग्रजी भाषेतून 30 प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे 35 आणि तर्कक्षमतेतून 35 प्रश्न विचारले जातील.
प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतील.
मुख्य परीक्षा
मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 200 प्रश्न विचारले जातील ज्यासाठी उमेदवारांना 135 मिनिटे मिळतील.
यामध्ये रिझनिंग, इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटरमधून 40-40 प्रश्न विचारले जातील.
प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2023
परीक्षा (Online):
पूर्व परीक्षा: 21 & 23 ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा: 02 डिसेंबर 2023