RBI रिझर्व्ह बँकेत विविध पदांसाठी भरती ; वेतन दरमहा ७७ हजारांवर
ज्या उमेदवारांना बँकेतील नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) विविध पदांच्या एकूण २९ जागांसाठी भरती निघाली आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मार्च २०२१ पर्यंत आहे. या पदांवरील वेतनश्रेणी दरमहा पगार ७७,२०८ रुपये असेल.
एकूण जागा : २९
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लीगल ऑफिसर (ग्रेड-बी) – ११
शैक्षणिक पात्रता: कायद्याची पदवी, अनुभव-दोन वर्ष
2) व्यवस्थापक (टेक्निकल-सिव्हिल) – ०१
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी, अनुभव-तीन वर्ष
3) असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) – १२
शैक्षणिक पात्रता: इंग्रजी आणि हिंदी विषयांमध्ये किमान व्दितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी
4) असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल व सुरक्षा) – ०५
शैक्षणिक पात्रता: सैन्य (Army), नौदल (Navy) किंवा हवाई दलात (Air Force) कमीतकमी ५ वर्षे अधिकारी दर्जाची सेवा केलेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
पद क्र.1: २१ ते २३ वर्षे.
पद क्र.2: २१ ते ३५ वर्षे.
पद क्र.3: २१ ते ३० वर्षे.
परीक्षा फी : सर्वसाधारण, ओबीसी प्रवर्गांसाठी ६०० /- रुपये (एससी एसटी प्रवर्गांसाठी १०० / रुपये)
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख : २३ फेब्रुवारी २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० मार्च २०२१
निवड : लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल. लेखी चाचणी १० एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.rbi.org.in
जाहिरात (Notification) : पाहा