RBI : रिझर्व्ह बँकेत ‘ऑफिस अटेंडंट’च्या 572 जागांसाठी भरती; 10वी पाससाठी नोकरीची संधी

Published On: जानेवारी 15, 2026
Follow Us

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. RBI ने ऑफिस अटेंडंट पदांसाठी ही भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 15 जानेवारीपासून सुरु अली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 फेब्रुवारी 2026 आहे.

विविध राज्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. अहमदाबाद, बंगळुरु, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, मुंबई, दिल्ली, पाटना येथे ही भरती केली जाणार आहे.

रिक्त पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट
शैक्षणिक पात्रता: i)10वी इयत्ता (एस.एस.सी./मॅट्रिक्युलेशन) उत्तीर्ण. ii) अंडरग्रॅज्युएट उमेदवार देखील अर्ज करु शकतात.

वयोमर्यादा: अर्जदारांचे वय किमान १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २५ वर्षे असणे आवश्यक आहे. जन्मतारखेनुसार, उमेदवारांचा जन्म २ जानेवारी २००१ पूर्वी आणि १ जानेवारी २००८ नंतर झालेला नसावा. दोन्ही तारखा विचारात घेतल्या जातील. राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट देखील लागू आहे.
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणीद्वारे केली जाईल.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS : ₹450/- plus 18% GST (SC/ST/PwBD/EXS : ₹50/- plus 18% GST)
पगार : निवडलेल्या उमेदवारांना ₹24,250/- ते 53,550/- या वेतनश्रेणीमध्ये दरमहा मूळ वेतन आणि वेळोवेळी देय असलेले इतर भत्ते मिळतील.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 फेब्रुवारी 2026

अधिकृत वेबसाईटrbi.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now