⁠  ⁠

नाशिक महानगरपालिकेत लवकरच 706 जागांसाठी होणार भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

नाशिक महानगरपालिकेत नोकरी मिळविण्यासाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून लवकरच 706 जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. याबाबत जुलैअखेरीस नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करता येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय.

नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत आस्थापना खर्च 35 टक्क्यापेक्षा कमी असल्याशिवाय नोकरभरती करता येणार नाही, या अटीला सवलत असल्यामुळे महापालिकेने 706 पदांच्या नोकरभरतीसाठी हालचाली गतीमान केल्या आहेत.

जूलै महिन्याच्या अखेरपर्यंत टिसीएस या कंपनीमार्फत नोकरभरतीसाठी आवश्यक सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. तसे झाले तर जुलैअखेरीस नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करता येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय.

कोरोनाकाळात महापालिकेतील नोकरभरतीचे महत्व लक्षात आले होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेची चांगलीच ओढाताण झाली होती. कंत्राटी तत्त्वावर दोन हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करून महामारीचा सामना करण्यात आला.

दरम्यान, महापालिकेत आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील 7082पदे मंजूर असून त्यातील जवळपास 2800 पदे सध्या रिक्त आहेत. मात्र ३५ टक्क्यांवर आस्थापना खर्च जात असेल तर रिक्त पदांची भरती करू नये, अशी अट असल्यामुळे पालिकेला नोकरभरती करण्यावर मर्यादा होत्या.

मात्र आता शासनाने अग्निशमन विभागातील ३४८ तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांच्या भरतीला मान्यता दिल्याने या पदांवर नोकरभरती करण्यात येणार आहे.

Share This Article