आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या क्रीडापटूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा (सीजीएचएस) लाभ मिळावा, अशी विनंती माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सचिनने २४ ऑक्टोबरला मोदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अव्वल क्रीडापटूंना उतारवयात भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्येवर प्रकाश टाकताना औषधोपचाराच्या अतिरिक्त खर्चाचा ताण त्यांच्यावर पडतो, असे म्हटले आहे. आपल्या पत्रात त्याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघांमध्ये समाविष्ट असलेल्या मोहम्मद शाहीद यांचे उदाहरण दिले आहे. एकापेक्षा जास्त अवयव निकामी झाल्याने जुलै महिन्यात शाहीद यांचा मृत्यू झाला होता. बेताची आर्थिक स्थिती असल्याने त्यांना वेळेवर आणि मोठय़ा रुग्णालयात उपचार घेता आले नाहीत. पंतप्रधान मोदी यांना विनंती करण्यापूर्वी क्रीडापटूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळण्याबाबत क्रीडा मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्याचे सचिनने त्याच्या पत्रात म्हटले आहे.
LATEST Post
भारतीय हवाई दलात 340 जागांसाठी भरती ; 12वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी
Published On: डिसेंबर 13, 2025
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे विविध पदांसाठी भरती
Published On: डिसेंबर 12, 2025
UPSC NDA Bharti : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये 394 जागांसाठी भरती; पात्रता फक्त 12वी पास
Published On: डिसेंबर 11, 2025
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 50 जागांसाठी भरती
Published On: डिसेंबर 11, 2025
इंडियन ऑइल मध्ये विविध पदांच्या 509 जागांसाठी नवीन भरती
Published On: डिसेंबर 11, 2025
RITES लिमिटेड मध्ये 150 पदांसाठी भरती
Published On: डिसेंबर 10, 2025
मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क, शिपाईसह विविध पदांच्या 2331 जागांसाठी मेगाभरती
Published On: डिसेंबर 9, 2025
21 डिसेंबरला होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख जाणून घ्या
Published On: डिसेंबर 8, 2025













