⁠  ⁠

सिक्युरिटी गार्डचा मुलगा झाला IRS अधिकारी !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

आपण घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण अपूर्ण राहिलेले बरेच जण बघत असतो. पण त्यावर उपाय काढत अभ्यास करणारे मोजके असतात. त्यापैकी एक कुलदीप द्विवेदी.

कुलदीप याने २०१५मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) घेतलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत २४२वा रँक मिळवला. लहानपणापासूनच गरीब आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या कुलदीप द्विवेदी यांने अपार कष्ट सोसले.पण जिद्द कायम ठेवली.

IRS कुलदीप द्विवेदी हा उत्तर प्रदेशातील निगोह जिल्ह्यातील शेखपूर या छोट्याशा गावचे रहिवासी आहे. त्याचे वडील सूर्यकांत द्विवेदी लखनौ विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. कुटुंबातील ते एकमेव कमावते सदस्य होते, त्यांचा पगार फक्त ११०० रुपये होता. मुलांना शिकवण्यासाठी ते दिवसा शेतात काम करून नंतर नोकरी करायचे.

चार भावंडांमध्ये कुलदीप हा अभ्यासात सर्वात हुशार मुलगा.त्याने २००९ मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. २०११ मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अलाहाबादमध्ये राहून त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. त्यानंतर त्याच्याकडे मोबाईल नसल्याने तो पीसीओच्या माध्यमातून कुटुंबीयांशी बोलत असे.

कुलदीप द्विवेदी २०१५ मध्ये UPSC परीक्षेत बसला. तो त्याच्या पहिल्याच प्रयत्नात २४२ व्या क्रमांकाने IRS म्हणून यशस्वी झाला. त्याचे प्रशिक्षण ऑगस्ट २०१६ मध्ये नागपुरात घेतले. कुलदीपने यूपीएससी परीक्षेसाठी कोणतेही कोचिंग घेतले नव्हते. इतर उमेदवारांकडून पुस्तके उधार घेऊन तो स्वयंअध्ययन करायचा.

Share This Article