SSC Recruitment 2023 कर्मचारी निवड आयोग (SSC) लवकरच नवीन मेगाभरती करणार असून यात केंद्रीय पोलीस संघटना (CPO) म्हणजेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) इत्यादींमध्ये दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (कार्यकारी) आणि उपनिरीक्षकांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करेल.
SSC च्या कॅलेंडरनुसार, उपनिरीक्षक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे आणि 12 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणार आहे.
परीक्षेची तारीख :
जे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करतील ते 03 ते 06 ऑक्टोबर 2023 या कालावधीत परीक्षेला बसू शकतात. परीक्षेची पद्धत ऑनलाइन आहे.
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. तसेच उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षे दरम्यान असावे.
वेतनमान– रु.35400/- ते 112400/- असेल
परीक्षा :
परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. ज्यामध्ये 200 प्रश्न विचारले जातील. परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न सामान्य ज्ञान, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन या विषयांचे असतील. परीक्षा दोन तासांची असेल.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in