SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांच्या 1207 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 3, 2023
Follow Us

SSC Stenographer Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांसाठी मोठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 1207

रिक्त पदाचे नाव :
1) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) 93
2) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) 1114
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. तर SC, ST, PWD, महिला आणि माजी सैनिकांसाठी अर्ज विनामूल्य ठेवण्यात आले आहेत.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाते.

पगार
एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप सी च्या पदांनुसार ग्रेड पे 4200 आणि 4600 रुपये ठेवण्यात आले आहे. एसएससी स्टेनोग्राफर ग्रुप डी पदांसाठी वेतनमान 2400 रुपये आहे. अधिसूचनेत अधिक तपशील तपासले जाऊ शकतात.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023 (11:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now