⁠  ⁠

Mission STI – परीक्षा स्वरूप- विषयानुसार

Rajat Bhole
By Rajat Bhole 2 Min Read
2 Min Read

परीक्षेचे तुमचे टार्गेट नक्की झालेय आता प्रत्यक्षात पूर्व परीक्षेच्या स्वरूपाकडे आपण वळूयात…


 STI-पूर्व ही परीक्षा १०० गुणांसाठी आहे.

एकूण प्रश्न संख्या ही देखील १०० इतकी आहे.

या साठी ६० मिनिटे इतका वेळ उपलब्ध आसतो.

बरोबर उत्तरासाठी +१ तर चुकीच्या उत्तरासाठी -१/३ अशी गुणपद्धत आहे.


ही प्राथमिक माहिती आपणा सर्वाना आहेच .या Article मध्ये नेमके परीक्षेत कोणत्या विषयावर किती व काय topics वर प्रश्न विचारले जातात  या विषयी आपण जाणून घेणार आहोत.

मी यासाठी माझ्या स्वतःच्या विषयानुसार Analysis केलेला snapshot तुमच्या सोबत शेयर करत आहे..

.20141113_145644

 

वरील फोटोत – विषय आणि त्यावरील अपेक्षित प्रश्नसंख्या. मागील काही प्रश्नपत्रीकेंच्या Analysis वरून दिल्या आहेत त्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरतील.

याच प्रमाणे कोणत्या विषयाचा काय syllabus आहे तो खाली details मध्ये देत आहे..


१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

२. राज्यघटना – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)

३. आधुनिक भारताचा विशेषत:  महाराष्ट्राचा इतिहास

४. भूगोल  (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह)- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

५. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी

६. सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.

७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित .

 

या वरील details मुळे आपणास आता अभ्यास सुरु करण्यास कोणतीही अडचण येणार नाही आशी आशा आहे.

पुढील article Exam Stratergy वर असेल. 

Share This Article