⁠  ⁠

अवचार दाम्पत्याचे एमपीएससीच्या परीक्षेत यश !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story आयुष्यात एकमेकांची साथ असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते. हे शेळद येथील ॲड. प्रदीप अवचार व ॲड. मुक्ता प्रदीप अवचार या पती-पत्नीने दाखवून दिले आहे. बाळापूर तालुक्यातील शेळद येथील पती ॲड. प्रदीप अवचार व पत्नी ॲड. मुक्ता प्रदीप अवचार या दोघांनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट-अ ही परीक्षा उत्तीर्ण केली.

प्रदीप यांच्या घरची परिस्थिती तशी‌ बेताची होती. यात आई-वडील दिव्यांग दोघेही…. कुठलीही जमीन जुमला, शेती, मालमत्ता नाही.मुलाला शिकवण्याची जिद्द खूप होती. दिव्यांग असताना बाळापूर सारख्या ठिकाणी टेलरिंग काम करून त्यांनी तीनचाकी सायकलवर प्रवास करीत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह केला.

त्याने देखील शिक्षणाची जिद्द पूर्ण ठेवून वकीलीचे शिक्षण घेतले व परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याच्या शिक्षणाकरिता त्याचा लहान भाऊ यांने सुद्धा अनेक वेळा प्रदीपला मदत केली व सर्वांनी त्याला सहकार्य केले. याच दरम्यान त्यांचे मुक्ता यांच्यासोबत लग्न झाले. प्रदीप यांनी आपल्या पत्नीला देखील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. दोघांनीही घरच्या अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करीत आपला अभ्यास पूर्ण करून त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे.केवळ मेहनत, सातत्य व अभ्यासाच्या जोरावर दोघेही पती-पत्नी क्लास वन अधिकारी या पदापर्यंत पोहोचले आहेत. प्रतिकूलतेवर मात करत एमपीएससीची सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ ही परीक्षा उत्तीर्ण केली, ही मोठी गोष्ट आहे. इतकेच नव्हे तर ॲड. प्रदीप अवचार यांची पत्नी ॲड. मुक्ता अवचार ने सुद्धा पतीसोबतच परीक्षा उत्तीर्ण करत माहेरच्यांसह सासरच्यांचे नाव उज्ज्वल केले आहे

Share This Article