---Advertisement---

शेतकऱ्याच्या लेकीचा MPSC परीक्षेत डंका! परिस्थितीवर मात करून मिळविले घवघवीत यश

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

सरकारी अधिकारी व्हावे, अशी अनेक तरुण-तरुणींची इच्छा असते. एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. यात काही विद्यार्थ्यांना यश मिळते तर काही विद्यार्थ्यांच्या पदरी अनेकदा वर्षानुवर्ष मेहनत करुनही अपयश येतं. पण परिस्थितीला कारण न बनविता सातत्यापूर्ण प्रयत्न केले तर यश मिळतंच. याच उदाहरण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील साखरा गावच्या शेतकरी कुटुंबातील मुलीने आपल्या मेहनतीच्या जोरावर MPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे.

विद्या कांदे असं तिचं नाव… तिने फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात कर निरीक्षक म्हणून सहावा क्रमांक पटकवला आहे. विद्याचं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या 2021 च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात विद्याला 277.5 मार्क मिळाले आहेत. या गुणांसह विद्याने राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. 2021 साली विद्याने ही परीक्षा दिली होती. विद्याच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

विद्याने सुरुवातीचे शिक्षण साखरा गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतले. 10 वीनंतर 11 वी व 12 वी चे शिक्षण तिने परभणी येथील नवोदय विद्यालयत पूर्ण केले व सध्या ती साखरा येथे ग्रामीण डाक सेवक या पदावर कार्यरत आहे. हि नौकरी करत तिने महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक या पदावर तिची निवड झाली आहे व महाराष्ट्रातून मुली मधून सहावा क्रमांक तिने पटकावला आहे.

विद्याच्या या यशामागे तिच्या भावाचा सिंहाचा वाटा आहे. विद्या लहान असतांना तिचे वडील मृत्यू पावले. आई ने काबड कष्ट करू मुलाबाळांना शिकवले मात्र जसे मुले मोठी होत गेली तसा शिक्षणाचा खर्च देखिल जास्त लागत होता. विद्याचा भाऊ विकास कांदे यांनी स्वताचे शिक्षण कमी केले मात्र आपल्या बहीनेचे शिक्षण पूर्ण केले. तिचे राज्यकर निरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल सर्व स्तरावरुन तिचे कौतुक केले जात आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now