सांगोल्याच्या सुपुत्राची मुख्याधिकारी पदी झेप !
जेव्हा गावचा मुलगा प्रशासकीय अधिकारी होतो तेव्हा संपूर्ण गावासाठी ती कौतुकास्पद आणि अभिमानाची गोष्ट असते. अजय अर्जुन नरळे हा ते मूळचा सांगोला तालुक्यातील तिप्पेहळ्ळी गावचे रहिवासी आहेत . त्यांनी सन २०११ मध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे, जिल्हा रायगड येथून अभियांत्रिकी पदवी घेतली आहे . नगरविकास विभाग खात्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पहिल्याच प्रयत्नात मुख्याधिकारी पदी निवड झाली आहे. सध्या तो मंगळवेढा नगरपालिकेत कार्यरत आहे.
त्यांनी आजवर वेगवेगळ्या ठिकाणी पाणीपुरवठा विभागासोबत विद्युत विभाग , अग्निशमन विभाग व वृक्षपाधिकरण विभागात कामकाज केले होते . अजय नरळे हे जुलै २०१८ पासून मंगळवेढा नगरपालिका येथे रुजू होऊन कामकाज पाहत आहेत , त्यापूर्वी त्यांनी सांगोला नगरपालिका (सोलापूर) व कोपरगाव नगरपालिका (अहमदनगर) येथे २०१३ ते २०१८ पर्यंत पाणीपुरवठा अभियंता म्हणून कामकाज पाहिले आहे . अतिशय शांत , संयमी , स्वभाव व सोबत काम करणारे कर्मचारी यांच्याशी मिळून राहणे,असा त्यांचा स्वभाव आहे .नगरविकास विभागाकडे यापूर्वी ८ वर्षे अभियंता म्हणून सेवा केल्याने त्यांना मुख्याधिकारी म्हणून सेवा करताना पूर्वीच्या कामाच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल.
त्यांनी मंगळवेढा येथे काम करताना शहराला तसेच शहरालगतच्या दोन्ही ग्रामपंचायत संत चोखामेळा नगर व संत दामाजी नगर येथे कोणतीही तक्रार न येवू देता दुष्काळ परिस्थिती असताना ही व्यवस्थितरित्या पाणीपुरवठा करून आपले कर्तव्य पार पाडले , जलशुद्धीकरण केंद्र , स्मशाभूमीत व शहरामध्ये तसेच इतर विविध ठिकाणी झाडे लावली . स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध कामे पार पाडली . त्याची मुख्याधिकारी पदी असणारी ही झेप समाज उपयोगी नक्कीच ठरत आहे.