भूषण राजेंद्र देशमुख हा कळवण तालुक्यातील ओतूर येथील शेतकरी कुटुंबात जडणघडण झालेला लेक.भूषणचे आई-वडील दोघेही शेती करतात. भूषणचे प्राथमिक शिक्षण ओतूर या मूळगावी माध्यमिक विद्यालयात झाले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पिंपळनेर येथील कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील विद्यालयातून विज्ञान शाखेतून पूर्ण केले. यानंतर पुढे बी.एस्सी (कृषी) चे शिक्षण के. के. वाघ कृषी महाविद्यालयातून २०१७ साली पूर्ण केले.
आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करायलाच हवी. हा ध्यास उराशी बाळगून वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.नाशिकच्या मुंबई नाका परीसरातील कमळाबाई गिते अभ्यासिकेत त्याने तयारी सुरु ठेवली होती.
अवघ्या कमी वयात त्याने जिद्द, चिकाटीच्या जोरावर त्याने यशाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच पोलिस उपनिरीक्षक २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यात त्याची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.