परिस्थितीवर मात करत अभ्यासात स्वतःला झोकून देऊन रमेश झाले जिल्हाधिकारी!
MPSC Success Story : कोणत्याही यशाच्या मागे एक तरी संघर्षमय कहाणी असेच. तशीच रमेश घोलप यांची कहाणी आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची….वडिलांना दारूचे व्यसन त्यात उदरनिर्वाहाचा रोजचा प्रश्न
असं असूनही आयुष्यात आलेल्या समस्यांना त्यांनी कधीही पाठ दाखवली नाही आणि त्यांचा खंबीरपणे सामना केला. त्यामुळेच, त्यांनी जिल्हाधिकारी हे पद मिळवले.
रमेश घोलप हे सोलापूर जिल्ह्यातील महागावचे रहिवासी आहेत. वडील गोरख घोलप हे वाहनांचे पंक्चर बनवायचे. तर आई विमल देवी रस्त्यावर बांगड्या विकायची. कधी रमेश आईला कामात तर कधी वडिलांच्या कामात मदत करायची. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते आपल्या मामाच्या गावी ‘बारसी’ येथे गेले.
पहिल्यापासून हुशार असल्याने रमेशला बारावी बोर्डाच्या परीक्षेत ८८.५०% टक्के गुण मिळाले डिप्लोमा इन एज्युकेशन केल्यानंतर रमेशने गावातीलच शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. डिप्लोमासोबतच त्यांनी बीएची पदवीही घेतली.
त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. यूपीएससी परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले. त्याच वर्षी राज्यसेवा परीक्षेत देखील ते राज्यात टॉपर राहिले होते. आयएएस रमेश घोलप झारखंड केडरमध्ये जिल्हाधिकारी पदावर आहे.
घरची आर्थिक परिस्थितीही बेताची होती असे सगळे असूनही त्याचे ध्येय स्पष्ट होते. त्यांना यशाच्या त्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचायचे होते. जिथून ते आपल्या कुटुंबातीलच नव्हे तर समाजातील गोर-गरीब लोकांच्या पण उपयोगी पडू शकतील. या विचाराने मिळवलेले हे यश अनेकांना प्रेरणा देणारे आहे.