⁠  ⁠

कष्टाचे चीज झाले; सायकलच्या टायरचे पंक्चर काढणाऱ्याचा लेक झाला न्यायाधीश!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

लहानपणापासून गरिबी वाट्याला…बेताची परिस्थिती पण शिक्षण आणि जिद्द मात्र मनाशी पक्की होती. त्यामुळेच, याच चिकाटीने अभ्यास करून अहद अहमद न्यायाधीश झाला. अहद अहमद हा प्रयागराज शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नवाबगंज भागातील बरई हरख या छोट्याशा गावचे रहिवासी. त्यांचं एक छोटेसं मोडकळीस आलेलं घर आहे.

अहद याचे वडील शेहजाद अहमद आणि आई अफसाना बेगम यांचा मुलगा.अहद अहमद हे चार भावंडांमध्ये तिसरे आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी अहद यांचे शिक्षण तर केलंच पण इतर मुलांनाही शिकवलं. अहद यांचा मोठा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे. लहान भाऊ एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक आहे. घराशेजारी वडील शहजाद अहमद यांचे सायकल पंक्चरचे छोटेसे दुकान आहे. या दुकानात ते मुलांसाठी टॉफी आणि चिप्सही विकतात. हे दुकान अजूनही चालतं. अहद देखील कधीकधी वडिलांच्या कामात मदत करायचा. अफसाना बेगम ह्या शिलाईचे काम करतात. आई – वडिलांनी रात्रंदिवस मेहनत करून मुलांना शिकवलं. यांची जाणीव ठेवून त्याने देखील अभ्यास केला.

गावाकडे शिक्षण झाल्यावर त्याने वकील क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर प्रांतीय नागरी सेवा (न्यायिक) अंतिम परीक्षा पास केली. अशा एका मागून एक बऱ्याच परीक्षा पार करत. आता तो दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) झाला आहे. परिस्थिती कोणतीही असली तरी ध्येय साध्य करण्याची धमक हवी हेच अहद याने दाखवून दिले.

Share This Article