⁠
Inspirational

अभिमानास्पद बाब; सफाई कामगाराचा मुलगा झाला अधिकारी

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी अडचणींवर मात करत अभ्यास करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तसेच प्रशांत सुरेश भोजने हा घरात एकत्र कुटुंबात प्रशांत वाढला. मात्र फुले-शाहू आणि आंबेडकर यांचे विचार पुढे नेत त्याने शिक्षणाला प्राधान्य दिले.

त्याच्या या यशाने संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. या संपूर्ण प्रवासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे प्रेरणास्थान आहेत. अडचणी येतच असतात मात्र त्यावर मात कशी करायची हे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी शिकवले.‌ तो त्याच्या कुटुंबातील एकमेव सदस्य आहे. तो घरापासून आणि कुटुंबापासून लांब शिक्षणासाठी बाहेर गेला. त्यातच इयत्ता दहावीपासून अभ्यासासाठी अभ्यासिकेत जाण्यास सुरुवात केली.

ठाणे येथील खारटन रोड येथील महापालिकेच्या चाळीतील त्या अभ्यासिकांचा नक्कीच मला फायदा झाला आहे. तसेच या परीक्षेच्या तयारीसाठी दिवसाला १० ते १२ तास अभ्यास करायचा. ठाणे महापालिकेत सफाई कर्मचारी तर वॉटर सप्लाय डिपार्टमेंटमध्ये बिगारी कामगार असलेल्या आई वडिलांचा हा मुलगा त्याने इंजिनिअरिंग झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यातच त्याला शिष्यवृत्ती मिळाल्यावर तो या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीत गेला. यात दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये काम करून प्रशांतने अभ्यासासोबतच उदरनिर्वाह केला.

त्याचे पालक त्याला नियमितपणे परीक्षा थांबवून घरी परतण्यास सांगत होते, परंतु त्याला विश्वास आणि दृढनिश्चय प्रबळ होता; आणि त्याच जोरावर त्याने आपले ध्येय साध्य केले आहे.परीक्षा उत्तीर्ण होण्याचा ध्येय मनाशी बांधून तब्बल ८ ते ९ वर्षे परिवार आणि मित्रांपासून लांब राहून तो दिल्लीत परीक्षेची तयारी करत होता. परीक्षा पास करण्यासाठी सातत्याने अपयश येत असताना कोणतीही हार न पत्करता प्रयत्नांची त्याने पराकाष्ठा केली. नऊ वेळा त्याने युपीएससी परीक्षा पास करण्याचा प्रयत्न केला आणि नवव्या वेळी मात्र यश त्याच्या पदरात पडले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत त्याचा क्रमांक ८४९ वा आहे.

Related Articles

Back to top button