⁠
Inspirational

शीतलने केली एकाचवेळी चार सरकारी नोकरीच्या परीक्षा उत्तीर्ण !

आपल्याला स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली तर यश हे नक्कीच मिळते. त्यासाठी जिद्द आणि सातत्य महत्त्वाचे आहे. शीतल धर्मा पगार ही कळवण येथील रहिवासी आहे.त्याची घरची परिस्थिती जेमतेम असल्याने तिने सरकारी नोकरीचा ध्यास घेतला.

शीतलचे प्राथमिक शिक्षण शासकीय जि. प. मराठी शाळेत झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जनता विद्यालयात झाले. बारावीनंतर ‘सीईटी’ व ‘जेईई’ला चांगले गुण असल्याने फार्मसी व इंजिनिअरिंग पर्याय समोर होते.पुढे तिने बीएसस्सीपर्यंत शिक्षण घेतले.यापुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.

धन्वंतरी कॉलेज नाशिक येथे डीएमएलटीत पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले.शिक्षण पूर्ण होताच नाशिक येथील डॉ. राजोळे पॅथॉलॉजी लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून नोकरी सुरु केली. यावेळी चांगला पगार व डॉ. राजोळे यांचे मार्गदर्शन लाभले. मिळालेल्या पगारात लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण करणे सोपे झाले. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास केला. यामुळे तिची केंद्रीय राखीव दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ, संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ व महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागात रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदावर निवड झाली.

Related Articles

Back to top button