शेतकऱ्याच्या मुलांची जीवनकहाणी आणि सामान्य मुलांची जीवनकहाणी यात बराच फरक असतो. पण शेतकऱ्यांच्या लेकीने करून दाखवले आहे.वैष्णवी बाळासाहेब भोर ही आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील सर्वसामान्य शेतकऱ्याची कन्या.
तिचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. येथीलच विद्या विकास मंदिर विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले.त्यानंतर नारायणगाव येथील गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यावर तिने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय (कोल्हापूर) येथून कृषी शाखेची पदवी संपादन केली. सध्या ती पुणे येथील कृषी महाविद्यालयात कृषी वनस्पतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. अभ्यास करत असताना तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.
पहिल्याच प्रयत्नात जालना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात तंत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (जालना) या ठिकाणी तंत्र अधिकारी या पदावर नियुक्ती झाल्याने तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.