⁠  ⁠

मेघनाची पुणे अग्निशमन दलात निवड ; ठरली पहिली महिला उमेदवार !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Success Story आपल्या आयुष्यात काही तरी करून‌ दाखवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. उच्च शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभ्या राहणे ही तिने देखील स्वप्न बघितले. नुसते स्वप्न बघितले नाहीतर ते पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. ती मुलगी म्हणजे मेघना सपकाळ. मेघनाची पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये अग्निशमन विमोचक (फायरमन) या पदासाठी निवड झाली आहे. तशी मेघनाच्या कुटुंबात देशसेवेचा वारसा आधीपासून आहे. तिचे आजोबा सदाशिव बापूराव सपकाळ हे अग्निशमन दलात कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत तर मेघनाचे वडील महेंद्र सपकाळ हे देखील अग्निशमन दलात कार्यरत आहेत.

आता मेघनाने देखील हा वारसा जपला आहे. तिने पुण्यातील गरवारे कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने अग्निशमन अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. आपली या क्षेत्रात निवड व्हावी म्हणून तिने अहोरात्र मेहनत घेतली. त्यासाठीचे सर्व टप्पे पार केले. काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेकडून अग्निशमन दलात १६७ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. तिने या भरतीसाठी अर्ज केला होता. तिने परीक्षा आणि पात्रतेचे निकष देखील पूर्ण केले.

अग्निशमनाचे प्राथमिक प्रशिक्षणाचे ३ महिने पार पडले. तिने या काळात फिजिकल फिटनेसवर मेहनत घेतली. तसेच, तिने शारिरीक व्यायामावर बरीच मेहनत घेतली.‌या सर्व प्रयत्नांना यश आले.पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली असून, हा मोठा अभिमानाचा क्षण आहे. तिने खऱ्या अर्थाने कुटुंबातील ही अग्निशमन दलातील सेवेची परंपरा मेघनाने ही आता जपली आहे.

Share This Article