⁠  ⁠

वेळप्रसंगी वॉचमन म्हणून काम केले अन् जिद्दीने मिळवली रेल्वेत नोकरी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Success Story कुमठेच्या प्रणीत घायाळकर हा होतकरू मुलगा. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. शिक्षण घेण्यासाठी देखील त्यांना संघर्ष सोसावा लागला. कधी पार्ट टाईम नोकरीच्या पैशाच्या जमवाजमवीतून शिक्षणाची वाट धरली. तर कधी अपार्टमेंटची वॉचमन म्हणून काम केले. त्यात ते कोरोना काळात आर्थिक संकटात सापडले. घर विकल्याने कोणताच आधार राहिला नाही. आईने सेल्‍समनचे काम सुरू केले.

वडील देखील बाहेर कामावर जाऊ लागले. जगण्यासाठी अटीतटीचा संघर्ष सुरू झाला. प्रणीत देखील अपार्टमेंटमध्ये साफसफाई, गाड्यांची स्वच्छता करू लागला. त्यानंतर थोडा पगार मिळू लागला. अकरावी व बारावी शिकला. नंतर त्याने डिझेल मेकॅनिक ट्रेडचा आयटीआय केला. मग टाटा मोटर्समध्ये काही महिन्याचे काम मिळाले. त्याचे जमलेले पैसे घेऊन प्रणीतने पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षात प्रवेश मिळवला. पुन्हा पैसे संपल्याने प्रणीतने एज्युकेशन लोन काढून पुढील वर्षाचे शिक्षण घेतले. व्ही. व्ही. पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात पार्ट टाइम बी.टेक.चे शिक्षण सुरू केले.

शिक्षणासोबत त्याने आता रात्रपाळीचे काम व दिवसात अपार्टमेंटचे काम, असे तीन कामे एकाचवेळी सुरू ठेवली.व्ही. व्ही. पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात पार्ट टाइम बी.टेक.चे शिक्षण सुरू केले. त्याने शिक्षणासोबत त्याने आता रात्रपाळीचे काम व दिवसात अपार्टमेंटचे काम, असे तीन कामे एकाचवेळी सुरू ठेवली.दरम्यान, रेल्वेच्या भरतीसाठी त्याने अर्ज केला. त्याचे क्लासेस लावण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. काहीतरी काटकसर करून अर्ज केला आणि परीक्षेचा अभ्यास केला. भरपूर मेहनत घेतली या मेहनतीच्या जोरावर त्याने रेल्वे खात्यात नोकरी मिळवली. त्यांच्या कष्टाची कहाणी ही अनेकांना प्रेरणा देणारी ठरते.

Share This Article