---Advertisement---

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या लेकीची प्रशासकीय अधिकारी पदावर झेप

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Success Story : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर गावची लेक शालू घरत अधिकारी झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी मिरवणूक काढून फुलांचा वर्षाव केला. कारण, शेतकऱ्याच्या लेकीने प्रशासकीय अधिकारी हे पद मिळवले. ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

शालूचे प्राथमिक शिक्षण हे चिमूर तालुक्यातील पांढरवानी गावातील जिल्हा परीषद शाळेत झाले. तिने यानंतरचे शालेय शिक्षण नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालय येथे घेतले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आंनद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे पूर्ण करून विज्ञान शाखेच्या पदवीचे शिक्षण नवरगाव येथील ज्ञानेश महाविद्यालयातून पूर्ण केले.

विज्ञान विषयातील पदवी मिळवल्यानंतर अधिकारी बनण्याच्या उद्देशाने नेचर फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा वर्गामध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण तिने घेतले. या सगळ्या शैक्षणिक प्रवासात तिला लक्षात आले की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना उच्च शिक्षण देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे तिने‌ पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतले.

घरची परिस्थिती बेताची होती.‌ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, महागडा क्लास आणि उच्च शिक्षण एकदम परवडत नव्हते. कारण, शालूचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांना हे पैसे पाठवणे शक्य नव्हते. म्हणून,‌ तिला ब्राईटएज फाऊंडेशनची या शैक्षणिक प्रवासात शिष्यवृत्ती मिळाली. यासाठी त्या फाऊंडेशनने बरीच मदत केली. ब्राईटएज फाऊंडेशनच्या मॅजिक परिवारामार्फत देण्यात येणाऱ्या सहारा शिष्यवृत्तीसाठी शालूची निवड करण्यात आली. या शिष्यवृत्तीमधून दरमहा आर्थिक मदत तिला मिळत होती.

त्यामुळे, तिचा दरमहा खर्च पण सुटत‌ होता आणि अभ्यास देखील होत होता.‌‌ तिने देखील जिद्दीने अभ्यास केला.‌ तिला औद्योगिक निरीक्षक परिक्षेत यश मिळाले. एवढेच‌ नाहीतर तिने अनुसूचित जमाती प्रवर्गातून महिलांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts