आयुष्यात यश-अपयश येणं नित्याचंच असते. किती जरी अपयश आले तरी खचून जायला नको. प्रत्येक गोष्टीतून काही ना काही मार्ग हा निघतोच. शंकर नागरे हा बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील आहे. त्याचे शालेय शिक्षण देखील याच गावात पूर्ण झाले. दुष्काळग्रस्त भागातील शंकरपुढे बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, आता पुढं करायचं तरी काय? हा प्रश्न होता.
घरचे संपूर्ण कुटूंब हे शेतीवर अवलंबून होते. मग जर इंजीनीअर, डॉक्टर व्हायचे ठरवले तर तेवढे पैसा नाही; मग करायचं काय? मग त्याने पोलीस व्हायचं ठरवले. समाजाची लोकांची सेवा करून आपल्याही परिवाराची सेवा करायची. त्यादृष्टीने तयारी सुरू केली, परंतू त्याचे शरीर बघून मुलं त्याला म्हणायचे, ‘तुझे वजन कमी आहे. तुझी शरीरयष्टी नाही, तुझ्याकडून ते होणार नाही.’
लोकांनी वारंवार नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या, चेष्टा केली पण स्वप्नाची वाट काढत शंकर मेहनत घेत राहिला.
पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना २०१४ ते २०२२ पर्यंत सतत अपयशी ठरत गेला, परंतू हार मानली.
याकाळात त्याने अनेक सरकारी परीक्षा, खाजगी नोकरी असे बरेच खटाटोप केले. त्याने खूप मेहनत घेतली. मेहनत करताना गावातील लोकं नाव ठेवत होती. त्यामुळे गावात फिरण्याची, कोणाच्या लग्नकार्यात जाण्याची इच्छा होत नव्हती. म्हणून तो २०२२ पर्यंत बाहेरच राहिला. एक खाजगी ॲकॅडमिकमध्ये परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. रोजच्या रोज वाचन, व्यायाम, वजनाकडे लक्ष या सूत्रांचे नियोजन करत अभ्यास करू लागला. अखेर, त्यांच्या कष्टाला यश मिळाले आणि मुंबई शहर पोलीस म्हणून नियुक्ती झाली.