⁠  ⁠

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २८८ जागांसाठी भरती ; 8वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Thane District Bank Recruitment 2022 : आठवी ते पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर २०२२ आहे. 

एकूण जागा : २८८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) कनिष्ठ बँकिंग सहाय्यक / Junior Banking Assistant २३३
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील. यासह उमेदवाराने शासन मान्य संस्थेतुन -MSCIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण केला असला पाहीजे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामधील पदविका/पदवी धारक.

२) शिपाई / Peon ५५
शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराचे ८ वी उत्तीर्ण वा १० वी पर्यंतचेच शिक्षण ग्राहय धरणेत येईल.

वयाची अट : २६ ऑगस्ट २०२२ रोजी, 
कनिष्ठ बँकिंग सहाय्यक – २१ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत
शिपाई – १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत

परीक्षा फी :
कनिष्ठ बँकिंग सहाय्यक – ८००/- रुपये + १४४/- रुपये
शिपाई – ५००/- रुपये + ९०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये.

निवड कार्यपध्दती : ऑनलाईन परीक्षा –

ज्यु. बैंकिंग असिस्टंट पदांकरीता ९० गुणांसाठी ऑनलाईन (Computer Based Exam) परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. यामध्ये बँकिंग, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१, इंग्रजी भाषा, मराठी भाषा, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल. परिक्षेचे माध्यम मराठी / इंग्रजी राहील.

शिपाई पदांकरीता ९० गुणांसाठी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. यामध्ये सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल. परिक्षेचे माध्यम मराठी / इंग्रजी राहील.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ सप्टेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.thanedistrictbank.com
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Share This Article