अल्पभूधारक शेतकरीपुत्र झाला प्रशासकीय अधिकारी!
आज ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अनेक मोठ्या पदांवर काम करत आहेत. त्यापैकी एक प्रदीप डोईफोडे. त्यांना एमपीएससी परीक्षांमधून राजपत्रित अधिकारी पद संपन्न झाले आहे.
प्रदीप हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी येथील आहेत. प्रदीपचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून कुटुंबातून कोणीच शासकीय नोकरीत नाही. परंतू प्रदीप याने कष्ट आणि मेहनत यांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. प्रदीप डोईफोडे यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण देऊळगाव राजा येथे झाले.त्यानंतर औरंगाबाद येथे पुढील शिक्षण झाले. सिव्हिल इंजिनीअरिंगची आवड होती. म्हणूनच, त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंग जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले.
इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर प्रदीप यांना अनेक नमांकित कंपनीमध्ये नोकरीच्या संधी आल्या होत्या. पण प्रशासकीय सेवेत जाण्याची त्यांची जिद्द आणि मनाची तयारी यामुळे खाजगी नोकरीत न अडकता त्यांनी त्यांच्या अभ्यास सुरू ठेवला.प्रदीपने पहिल्या प्रयत्नांत भटक्या जमाती वर्ग ड एनटी-डी मधून राज्यांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे