---Advertisement---

2026 मध्ये होणाऱ्या UPSC परीक्षांच्या तारखा जाहीर ; वेळापत्रक नक्की बघा

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

जर तुम्ही यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रिय लोकसेवा आयोग (UPSC)ने २०२६ मध्ये होणाऱ्य २७ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहेत. यामध्ये UPSC सिविल सर्व्हिस परीक्षा २०२६ प्रिलियम्स, यूपीएससी मेन्स, सीडीएस, एनडीए, इंजिनियरिंग सर्विस, सीबीआयसह अनेक परीक्षांची माहिती देण्यात आली आहे.

२०२६ मध्ये यूपीएससी परीक्षेची अधिसूचना १४ जानेवारी २०२६ रोजी जारी केली जाईल. या परीक्षेसाठी विद्यार्थी ३ फेब्रुवारीपासून अर्ज करु शकणार आहेत. यूपीएससी प्रिलियम्स परीक्षा २४ मे रोजी होणार आहे. यानंतर UPSC CSE मुख्य परीक्षा २१ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. याचसोबत UPSC NDA-I आणि CDS-I भरतीची जाहिरात १० डिसेंबर २०२५ रोजी जाी केले जाईल. यानंतर १२ एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे.

---Advertisement---

UPSC RT परीक्षा १० जानेवारी २०२६ पासून सुरु होणार आहे. कंबाइंड जियो सायंटिस्ट परीक्षा ८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. इंजिनियरिंग सर्विस प्रीलियम्स परीक्षादेखील ८ फेब्रुवारीला होणार आहे. सीबीआई (DSP) एलडीसीई परीक्षा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. CISF एसी (कार्यकारी) एलडीसीई परीक्षा ८ मार्च २०२५ रोजी होणार आहे.

यूपीएससी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक तुम्हाला अधिकृत वेबसाइटवरुन डाउनलोड करता येईल. यामध्ये एकूण २७ परीक्षांच्या तारखा दिल्या आहेत. कोणती परीक्षा कधी होणार याबाबत माहिती दिली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now