UPSC IAS Success Story : खरंतर, आयुष्यात यश आणि अपयश येणं ही येत – जात होणारी गोष्ट आहे. आदित्य पांडे यांची जडणघडण ही गरीब कुटुंबात झाली. त्यांच्या घरी तीन बहिण आणि एक भाऊ… त्यानंतर त्यांनी जामनगर येथे शिक्षण घेतले.या प्रवासात त्यांना दहावीला कमी गुण मिळाल्यामुळे वडिलांनी त्यांना पुन्हा पाटणा येथे पाठवले.
वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी बारावीनंतर इंजिनियरिंगसाठी प्रवेश घेतला.त्यांनी इंजिनियरिंग आणि एमबीए केले. या दरम्यान त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे दु:ख आणि एकाकीपणा वाट्याला आला. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी युपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले.परंतू पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश आले. तरीही ते डगमगले नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला.
त्यांना अनेकदा नकारात्मक गोष्टी वाट्याला आल्या. परंतू त्यानंतरही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. त्यांनी यूपीएससी परिक्षेत ४८ वी रँक मिळवली. अखेर, ते आयएएस अधिकारी झाले.