UPSC IAS Success Story : यूपीएससी परीक्षा पास होणं तितकं सोपं नाही.भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी ही एक परीक्षा.सर्व आव्हानं, सर्व परीक्षा, पराभवाला सामोरे जा आणि एकेदिवशी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर ते स्वत:ला सिद्ध करुन दाखवतात. याचे उदाहरण म्हणजे दीपेश कुमारी.राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील दीपेश कुमारी. दीपेश कुमारी हीचे एकूण सात जणांचे कुटुंब. तिने एका छोट्या घरात राहून हे यश संपादन केलं आहे. ती पाच भावंडांमध्ये सर्वात मोठी असल्याने जास्त जबाबदारी तिच्यावर होती. तिने संपूर्ण शिक्षण हे शिष्यवृत्तीवर केले.
तिने शिक्षणाला भरतपूरमधीन सुरुवात झाली. पुढे तिने जोधपूरच्या एमबीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर तिने आयआयटी बॉम्बेमधून मास्टर्स केले, जिथे तिने फेलोशिप मिळाली. तिच्या वडीलांनी चाट-पकोडे विकून संसाराचा गाडा हाकला. दीपेशचे वडील गोविंद हे २० वर्षांपासून एका हात गाडीवर चाट-पकोडे विकत आहेत. पण शिक्षणासाठी काहीच पडू दिले नाही. तिने देखील अभ्यासाची कास सोडली नाही. तिने २०१९ मध्ये, दीपेशने दिल्लीतील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली.पण कोरोनाचा काळ आला.
त्यामुळे पुन्हा घरून तयारी करावी लागली. पण तिने जिद्द सोडली नाही. अभ्यास चालू ठेवला.दीपेशनेही सुरुवातीच्या अडथळ्यांना न जुमानता, टिकून राहून तिच्या दुसऱ्या प्रयत्नात मुलाखतीचा टप्पा गाठला. यूपीएससी परीक्षेत ९३ वा क्रमांक पटकावला. अखेर, तिचे आय.ए.एस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.