⁠
Inspirational

जिद्दीची अनोखी कहाणी ; वाचा IAS अधिकारी गरिमा अग्रवालची यशोगाथा!

UPSC IAS Success Story : लहानपणापासून गरिमा ही हुशार असल्याने तिला अभ्यासाची प्रचंड आवड होती. नेहमीच ती शैक्षणिक वाटचालीत टॉपर राहिली. मध्य प्रदेशच्या खरगोनच्या भागातील गरिमा अग्रवाल ही एका व्यावसायिक कुटुंबात जन्मलेली मुलगी.गरिमा यांचे शालेय शिक्षण सरस्वती विद्या मंदिर, खरगोन येथून झाले‌.तिने शालेय जीवनातही अपेक्षांपेक्षा सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली.

तिने तिच्या दहावी आणि बारावीत अनुक्रमे ८९% आणि ९२% गुण मिळवले. तिच्या प्रवासाला मोठे वळण मिळाले जेव्हा तिने जेईई परीक्षा उत्तीर्ण केली आणि IIT आय.आय.टी हैदराबादमध्ये प्रवेश घेतला. जिथे तिने अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. त्यानंतर गरिमाने तिची क्षितिजे वाढवली आणि जर्मनीतील अप्रतिम इंटर्नशिप दरम्यान तिची कौशल्ये आणि ज्ञान वाढवले.प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात.

असंख्य अडचणींवर मात करून काही जण यशाचं शिखर गाठतात. हेच गरिमाने करून दाखवले. तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीच्या अपयशामुळे खचून न गेलेल्या गरिमाने कठोर तयारी प्रक्रियेत स्वत:ला झोकून दिले. मध्य प्रदेशच्या खरगोनच्या गरिमा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयपीएस रँक मिळवली होती. पण त्यांचे लक्ष्य वेगळे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

या दरम्यान तिने बऱ्याच मुलाखतींचा सराव, विविध प्रश्नांची तयारी केली‌‌. दुसऱ्या प्रयत्नात, तिने ४०वी रँक मिळवली आणि २०१८ मध्ये आयएएस अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण केले. यानंतर २०१९-२०२० मध्ये तिने मसुरी येथे प्रशिक्षण पूर्ण केले.

Related Articles

Back to top button