गावात राहून शेतकऱ्याच्या लेकीने केली कमाल; जिद्द, चिकाटीने बनली IAS अधिकारी
IAS Success Story खरंतर यश मिळवायचे असेल तर कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही. सिव्हिल सर्व्हिसेस किंवा इतर कोणतीही परीक्षा असो, त्यातून तुम्ही प्रेरित आहात ते साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतात. विशेषत: एमपीएससी, युपीएससीसाठी चिकाटी आणि संयम महत्त्वाचा असतो.
अशीच ध्येयवादी शेतकऱ्याची लेक हिमानी मीना (Himani Meena) ही IAS अधिकारी झाली. हिमानी मीना हिने युपीएससीच्या परीक्षेत २०२० मध्ये ३२३वा रँक मिळवला आहे. ती तिच्या ध्येयासाठी दृढ आणि मेहनती होती. हिमानीचे शालेय शिक्षण जेवार येथील प्रज्ञान पब्लिक स्कूलमधून झाले. तिने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून बी.ए राज्यशास्त्रात पदवी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधात एम.ए पूर्ण केले. ती पीएच.डी.चे शिक्षणही घेत आहे.
हिमानी मीनाचे वडील इंद्रजित मीणा हे शेतकरी आहेत. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. हे संपूर्ण कुटुंब मूळचे राजस्थानचे असून नोएडातील गौतम बुद्ध नगर अंतर्गत जेवार तहसीलच्या सिरसा माचीपूर गावात राहतात. शिक्षण घेत असताना हिमानीने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. तिच्या वडिलांनीच तिला लहान वयात यूपीएससी परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले आणि हळूहळू ते तिचे स्वप्नही बनले. ती दररोज किमान आठ तास अभ्यास करायची आणि तिचे हे अभ्यासातील सातत्य हेच तिच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. खरंतर तिचा हा चौथा प्रयत्न होता.
तिला पहिल्या तीन प्रयत्नांत पहिला टप्पा (प्रिलिम) क्लिअर आली नाही. तीन प्रयत्नांमध्ये उणीवा अभ्यासाने भरून काढल्या.तिला तिच्या पालकांचा आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या खूप मोठा पाठिंबा होता. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी तिच्या अभ्यासावर कधीही कोणताही अडथळा निर्माण झाला नाही, त्याऐवजी ते एक ढाल बनले.तिला आई-वडील आणि मित्रांकडून नेहमीच मदत आणि पाठिंबा मिळाला आणि म्हणूनच तिच्या मनात कधीही हार मानण्याची भावना नव्हती.
तिच्या या प्रवासात बरेच अडथळे आले. आपण सर्व जाणतो की युपीएससीची परीक्षा ही एक कठीण परीक्षा आहे.पण तिने स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी संघर्ष केला. जेव्हा जेव्हा तिला या काळात निराशा आली. तेव्हा, तिने नव्याने अभ्यासाला सुरुवात केली. अखेर, या कष्टाचे चीज झाले. हिमानी युपीएससीच्या परीक्षेत २०२० मध्ये ३२३वा रँक मिळवून आय.ए.एस अधिकारी झाली.