प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात ज्याने आयुष्य बदलून जाते,त्याला आयुष्याचा टर्निंग पॉईंट असेही म्हणतात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट नसतो त्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द आणि सातत्याने प्रयत्न करावे लागतात. अशाच इच्छाशक्तीच्या जोरावर आदित्य पांडे यांनी आयुष्यात यशाला गवसणी घातली आहे. परंतु हे यश त्यांच्या आयुष्यात येण्यामागे यांच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा वाटा आहे.
आदित्य पांडे एका मुलीवर खूप प्रेम करत होते परंतु त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत त्यांचा ब्रेकअप झाला, या ब्रेकअप वेळी त्यांच्या गर्लफ्रेंडने त्यांना हिणवले होते. आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवण्यास सांगितले होते. ही गोष्ट डोक्यात ठेवून त्यांनी काहीतरी मोठं करून दाखवण्याचा निर्णय घेतला. व त्यासाठी तयारी सुरू केली.
आदित्य पांडे यांनी इंजीनियरिंग आणि एमबीए केले. या इंजीनियरिंगच्या काळातच त्यांचे गर्लफ्रेंड सोबत ब्रेकअप झाले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यूपीएससी परीक्षेविषयी त्यांना फारसे माहिती नव्हती परंतु तरीदेखील त्यांनी मिळेल त्या ठिकाणी माहिती गोळा करत तयारीला सुरुवात केली. आदित्य पांडे हे गरीब कुटुंबातून येतात त्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव होती व समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची जिद्द सुद्धा. यूपीएससीची तयारी केल्यानंतर पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश आले परंतु तरीही न खचता त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली.
अनेक वेळा येणाऱ्या अपयशामुळे त्यांना अनेक नकारात्मक गोष्टी देखील ऐकाव्या लागल्या परंतु त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवत आपली तयारी सुरूच ठेवली. अखेर त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले व यूपीएससी परीक्षेत 48 वी रँक मिळवून कोचिंग तसेच सेल्फ स्टडी च्या जोरावर त्यांनी दोनदा अपयश आल्यानंतर तिसऱ्यांदा यूपीएससी ची परीक्षा क्रॅक केली.