एक नाही दोन वेळा UPSC क्रॅक केली; वाचा IAS झालेल्या दिव्या शक्ती यांची प्रेरणादायी कहाणी
UPSC Success Story : दिव्या शक्ती (Divya Shakti) यांच्या जीवनातील यशगाथा अनेक युवाओंसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीने दोन वेळा UPSC परीक्षा क्रॅक करून आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले. दिव्या शक्ती यांचा जन्म बिहारमधील (Bihar) एक छोट्या गावात झाला होता, पण त्यांचे स्वप्न मोठे होते.
शिक्षण आणि नोकरी
दिव्या शक्ती यांनी बिट्स पिलानी येथून बीटेकचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स डिग्री मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी एक चांगल्या कंपनीमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी सुरू केली. नोकरीत त्यांना पैसा, इज्जत, शान-शौकत सर्व काही मिळाले होते, पण त्यांच्या मनात काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहिले. काही सिनिअर्सचा सल्ला घेतल्यानंतर, दिव्या शक्ती यांनी युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
युपीएससी तयारी
दिव्या शक्ती यांनी कोणत्याही तयारीशिवाय युपीएससीचा पहिल्यांदा पेपर दिला. परीक्षा दिल्यानंतर, त्यांना समजले की या परीक्षेसाठी खऱ्या अर्थाने तयारी करणे आवश्यक आहे. त्यांनी दिवसरात्र अभ्यास सुरू केला आणि २०१९ मध्ये पहिल्यांदा युपीएससी परीक्षेत यश मिळवले, जिथे त्यांची रँक ७९ होती. आयपीएस म्हणून निवडण्यात आल्यानंतरही, दिव्या शक्ती यांना समाधान नव्हते. त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली आणि २०२२ मध्ये पुन्हा युपीएससी क्रॅक केले, जिथे त्यांची रँक ५८ होती. यावेळी त्यांना आयएएस पोस्टिंग देण्यात आली.
IPSची नोकरी सोडली
दिव्या शक्ती यांनी आयपीएसची नोकरी सोडली आणि आयएएस होण्यासाठी दिवसरात्र एक केले. त्यांचा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. आज, दिव्या शक्ती बिहारमध्ये घराघरात नाव पोहचवले आहेत आणि त्यांची यशगाथा अनेक युवाओंसाठी प्रेरणादायी आहे.