⁠
Inspirational

वडिलांसोबत विकला चहा! पण अथांग मेहनत आणि जिद्दीने हिमांशू बनला IAS ऑफिसर

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगली परिस्थिती नाही तर अथांग मेहनत आणि जिद्द असणे आवश्यक असते . याचेच उत्तम उदाहरण म्हणजे आयएएस ऑफिसर हिमांशू गुप्ता. शाळेत 70 किमी चा पायी प्रवास करून परिस्थितीवर मात करत, अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला येऊन देखील जिद्द मेहनत आणि सातत्याच्या बळावर ते आज आयएएस ऑफिसर बनले आहे.

हिमांशू गुप्ता यांचे वडील मजूर होते घरची परिस्थिती बेताची होती वडिलांना कामात मदत करण्यासाठी त्यांनी वडिलांसोबत चहाच्या दुकानात देखील काम केले. जेणेकरून वडील हे घर चालवू शकतील, परंतु अशा परिस्थितीत देखील अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. वडील जरी साक्षर न होते तरीही मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी होईल ते काम करत मुलाला शिकवले.

ऑफिसर च्या पदापर्यंत पोहोचण्याकरिता हिमांशू गुप्ता यांनी शालेय जीवनातही प्रचंड मेहनत घेतली हिमांशू गुप्ता हे शाळेत जाण्यासाठी ये जा करून दररोज 70 किमी प्रवास पायी करायचे. वडिलांना चहाच्या दुकानात मदत करत असताना त्यांच्या मित्राने पाहिले व त्यांची मस्करी करायला लागले, याचे उत्तर म्हणून त्यांनी मोठ्या जिद्दीने प्रयत्न केले व ते आज आहेस ऑफिसर झाले आहेत.

याच सातत्याने हिमांशू गुप्ता यांनी 2018 साली प्रथमच यूपीएससी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षेत यश आल्यानंतर त्यांची रेल्वे वाहतूक सेवेत निवड करण्यात आली. या ठिकाणी काम करत असताना त्यांनी 2019 साली पुन्हा एकदा यूपीएससी स्पर्धा परीक्षा दिली, व याही वेळेस त्यांना त्यामध्ये यश मिळाले व ते आयपीएस झाले. याच सातत्याने त्यांनी तिसऱ्यांदा 2020 साली पुन्हा परीक्षा दिली व ते आयएएस ऑफिसर झाले.

Related Articles

Back to top button