आयएएस कनिष्क कटारिया (Kanishka Kataria) यांनी परदेशात १ कोटी रुपये पगाराची नोकरी असताना ती नोकरी सोडून मायदेशी परतले. आणि यूपीएससी (UPSC) देण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच कनिष्क कटारिया यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी २०१८ च्या यूपीएससी परीक्षेत पहिली रँक मिळवली आहे.
कनिष्क कटारिया हे बंगळुरुत डेटा सायंटिस्टची नोकरी करायची. त्यांनी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षेत चांगले यश मिळवले. कनिष्क यांनी IIT बॉम्बेमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर देशातील सर्वात अवघड परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते परदेशात १ कोटी रुपये पगाराची नोकरी करत होते. परंतु त्यांनी देशासाठी काहीतरी करायचे म्हणून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
कनिष्क कटारिया हे जयपूरचे रहिवासी. त्यांचे वडील आणि काका हेदेखील सिविल सर्व्हिसमध्ये होते. वडीलदेखील आयएएस ऑफिसर होते.त्यांना पहिल्यापासूनच प्रशासकीय सेवेत काम करायचे होते. कनिष्क यांनी कोटा येथील सेंट पॉल सीनियर सेकंडरी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. २०१० मध्ये IIT JEE मध्ये ४४ रँक मिळवली. त्यानंतर आयआयटी बॉम्बेमधून कॉमप्युटर सायन्स अँड इंजिनियरिंगमध्ये बीटेक केले. त्यानंतर २०१४ मध्ये इंजिनियरिंगची पदवी मिळवली.
२०१६ मध्ये कनिष्क कटारिया यांनी दक्षिण कोरियात सँमसंग कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केले. त्यांना १ कोटी रुपयांचे वेतन मिळत होते. परंतु ते त्या कामात समाधानी नव्हते. त्यांना देशासाठी काहीतरी करायचे होते.
चांगल्या पगाराची नोकरी असतानाही कनिष्क हे परत भारतात परतले. त्यांनी बंगळुरुमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दिल्लीत ७-८ महिने कोचिंग घेतले. त्यानंतर २०१८ मध्ये स्वतः सेल्फ स्टडी करत होते. त्यांनी दिवसाला १३-१४ तास अभ्यास केला. त्यामुळेच त्यांना हे यश मिळाले.