⁠  ⁠

लहानपणी वडिलांचे छत्र हरपले; अनाथाश्रमात बालपण गेलं, पण जिद्दीनं मोहम्मद बनला आयएएस अधिकारी

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

सगळ्यात अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षांपैकी एक असलेली यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी सातत्य जिद्द आणि मेहनतीने अभ्यास करणे महत्त्वाचे असते. यशाचे शिखर गाठण्यासाठी अनेक अपयशांना देखील सामोरे जावे लागते परंतु जो त्या अपयशावर मात करून सातत्याने प्रयत्न करतो त्याला यश नक्कीच मिळते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे आयएएस मोहम्मद अली शिहाब.

मोहम्मद अली शिहाब यांच्या जन्म 15 मार्च 1980 रोजी केरळ मधील मलप्पुरम जिल्ह्यात झाला. आयुष्यात लहानपणापासूनच संघर्ष होता, वडिलांचे नाव कोरोट अली आणि आईचे नाव फातिमा असे आहे. मोहम्मद शहाब यांचे वडील बांबूच्या टोकरी आणि सुपारी विकायचे वडिलांना मदत म्हणून त्यांनी देखील ते विकायला सुरुवात केली परंतु लहानपणीच मोहम्मद यांचे वडील त्यांना सोडून गेले व मोहम्मद यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले.

वडील गेल्याने संपूर्ण जबाबदारी आईवर आली, घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आईने नोकरी करून कुटुंबाचे पालन पोषण केले. घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने आईने त्यांना अनाथ आश्रमात सोडले. इथून पुढचे सगळे आयुष्य मोहम्मद यांचे अनाथ आश्रमातच गेले. मोहम्मद यांच्यात लहानपणापासून मेहनत करण्याची तयारी होती म्हणून ते अनाथ आश्रमात देखील मन लावून अभ्यास करायचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले व त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

यूपीएससीची तयारी करत असताना त्यांना एक नव्हे दोन नव्हे तर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले व 2011 साली 226 रँक मिळवून त्यांनी यूपीएससीची परीक्षा क्रॅक केली. व आज ते नागालँड कॅडर मध्ये आयएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.

Share This Article