दरवर्षी, हजारो उमेदवार भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक संघ लोकसेवा आयोग (UPSC) ला बसतात. तरीही, फक्त काही जणच यात यशस्वी होतात आणि काही मोजकेच लोक आयएएस अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या प्रत्येक विजयी उमेदवाराने आपापल्या परीने अडचणींचा सामना केला आहे, परंतु आयएएस राम भजन कुम्हारा (Ram Bhajan Kumbhara) यांचा प्रवास कठोर परिश्रमाचा पुरावा आहे. जिद्दीने UPSC क्रॅक करून IAS बनले
रामभजनचा प्रवास एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. गरीब गावातून आले असूनही, आता त्याच्याकडे सरकारी पद आहे. राजस्थानमधील बापी नावाच्या गावातील रहिवाशी असलेले राम भजन कुम्हारा यांचे बालपण खूप खडतर परिस्थिती गेले. त्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते. परंतु तरीही त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले. त्यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी यूपीएससी परीक्षा दिली आणि क्लिअर केली.
राम भजन कुम्हारा हे मूळचे राजस्थानचे रहिवासी. त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते. एवढे सर्व असतानाही राम भजन यांनी शिक्षण घेतले. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ६६७ रँक मिळवली.राम भजन यांनी आपल्या आईसोबत काम केले आहे. ते आईसोबत दगड फोडण्याच्या कामासाठी जायचे.त्यांना यासाठी दिवसाला ५-१० रुपये मिळायचे. तर त्यांचे वडील आइस्क्रिम विकायचे काम करायचे. ते पाचवी-सहावीत असताना रोज काम करायचे.
१९९८ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. आपले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी सरकारी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. २००९ मध्ये त्यांना दिल्ली पोलिसमध्ये हेड कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली.
राम भजन कुमार यांनी २०१५ मध्ये यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली. परंतु त्यांना अनेकदा अपयश आले. परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाही. दरवर्षी परीक्षा दिली. अखेर २०२२ मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि ते आयएएस झाले.
राम भजन कुम्हारा यांच्याकडे शाळेत जाण्यासाठी कपडे नव्हते. शाळेत जाताना त्यांचे कपडे फाटलेले असायचे. अनेक ठिकाणी कपड्यांना टाके मारलेले होते. त्यांच्या घरात दोन वेळचे जेवण मिळत नव्हते. तरीही त्यांना या परिस्थितीतून मार्ग काढला आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.