UPSC IAS Success Story : आपली परिस्थिती बदलणं हे आपल्याच हातात असते. श्रीनाथ यांची परिस्थिती बेताची होती. गरीब परिस्थिती आणि कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली नव्हती. पण जगण्याची आणि शिक्षणाची इच्छा मात्र चांगली होती. त्यांनी ठरवले की आपल्याला एक ना एक दिवस अधिकारी बनायचे आहे.
केरळमधील एर्नाकुलम रेल्वेस्थानकावर कुली म्हणून काम करायला सुरुवात केली.कारण, रेल्वेस्थानकावर त्यांना मोफत वायफायची सुविधा असल्याने त्यांनी त्या परीक्षेसाठी स्वत:च नेटाने अभ्यास सुरू केला. स्टेशनवर ते कानात इअरफोन घालून, ऑनलाइन स्टडी मटेरियल व लेक्चर्स ऐकायचे, नोट्स काढायचे आणि रात्रंदिवस मेहनत करायचे. कारण, क्लास लावणे व जाणे हे शक्यच नव्हते. पण हा प्रवास सोपा नव्हता. तीन वेळा अनुत्तीर्ण झाले; पण जिद्दी व्यक्तीला अपयश आणखी कणखर बनविते, असे म्हणतात.
श्रीनाथ यांनीही हार न मानता, प्रत्येक अपयशातून काही ना काही शिकून, परीक्षेची तयारी अधिक जोमाने करण्यावर भर दिला. त्यांनी चौथा प्रयत्न करायचे ठरवले. श्रीनाथ युपीएससीच्या खडतर परीक्षेत प्रबळ इच्छाशक्ती आणि परिश्रमाचे फळ शेवटी त्यांना चौथ्या प्रयत्नात मिळाले आणि ते IAS अधिकारी बनले. आत्मविश्वासाने आपण काहीतरी ‘मोठे’ साध्य करू शकतो यासाठी श्रीनाथ हे उत्तम उदाहरण आहे.