UPSC Success Story : यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवायचे असेल तर खूप मेहनत करावी लागते. अशीच मेहनत यशनी नागराजन यांनी केली. अरुणाचल प्रदेशमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून, युपिया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमध्ये बीटेक करणारी यशनी नागराजन ही तामिळनाडूच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील इंजिनियर होते तर आई हायकोर्टात सुपरिंटेंडेंट होती. यशनी नागराजन (IAS Yashni Nagarajan) यांनी रिझर्व्ह बँकेतील फुल टाइम नोकरी करताना यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि चौथ्या प्रयत्नात यश मिळवले.
यशनी नागराजन यांनी यूपीएससीच्या २०१९ च्या बॅचमध्ये ५९वी रँक मिळवली. त्यांनी रोज ४-५ तास अभ्यास करून हे यश मिळवले. वीकेंडला पूर्ण दिवसभर त्यांनी सेल्फ स्टडी केली. तीन वेळा अपयश आले तरीही, यशनी नागराजन यांनी हार मानली नाही.
“यूपीएससी क्रॅक करण्यासाठी तुम्हाला नोकरी सोडण्याची गरज नाही. फक्त स्मार्ट टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचे आहे,” असे यशनी नागराजन यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेची तयारी आणि नोकरी या दोन्ही गोष्टी बॅलेंस करू शकतात.
यशनी नागराजन यांच्या यशाचं श्रेय त्यांनी नोकरीसोबत यूपीएससी परीक्षा क्रॅक केल्याला जातो. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत होतं.