⁠  ⁠

आंशिक अंधत्वाला न घाबरता, लिपिनने मिळवले IAS हे पद !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

UPSC IAS Success Story आयएएस अधिकारी लिपिन राज यांनी असंख्य आव्हानांचा सामना करून त्यांचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी आपल्या सर्व अडचणींना तोंड दिले. लिपिनचा आंशिक अंधत्वाशी झुंजणारा, प्रतिकूलतेतून यशापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी आशेचा किरण आहे.

लिपिनच्या सुरुवातीच्या आयुष्याला अनपेक्षित वळण आले होते. जेव्हा, वयाच्या नव्या वर्षी, एका वर्गमित्रामुळे कोणत्यातरी मशीनचा मार लागला. त्यामुळे, डोळ्याला जबर मार बसला. त्यावर उपचाराची क्षमता असूनही, करता आला नाही. त्याच्या वडिलांना मद्यपानाचे व्यसन होते त्यामुळे दुखापतीकडे दुर्लक्षित झाले.परिणामी आंशिक अंधत्व आले.

लिपिन यांचा जन्म केरळच्या पठाणमथिट्टा येथे झाला. अगदी सामान्य कुटुंबातील आयुष्य होते. त्याच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या घटनेने त्यांना आव्हानात्मक मार्गावर नेले.पण, या आंशिक अंधत्वामुळे न घाबरता, लिपिनने वयाच्या चोवीसाव्या वर्षे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्याचा शैक्षणिक प्रवास मल्याळम माध्यमाच्या सरकारी शाळेत सुरू झाला, जिथे ते सामान्य विद्यार्थी होते.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांनी बारावीच्या परीक्षेत मल्याळममध्ये १०० गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी प्रतिष्ठित महाविद्यालयात पदवी शिक्षण पूर्ण केले. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत यश मिळवण्यापूर्वी लिपिनने स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि आयडीबीआय बँकेत पाच वर्षे काम केले. ते युपीएससी मुख्य परीक्षेत मल्याळममध्ये बसला आणि मुलाखतीदरम्यान त्याने इंग्रजीची निवड केली. अखेर, २०१२ मध्ये, लिपिन राज यांच्या जिद्दीला फळ मिळाले जेव्हा त्यांनी नागरी सेवा परीक्षांमध्ये २२४वा अखिल भारतीय रँक मिळवला.

Share This Article