---Advertisement---

आर्थिक परिस्थितीवर मात करून शेतकऱ्याच्या पोरीनं UPSC क्रॅक केली; वाचा IAS मनिषा आव्हाळेंचा प्रवास

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Success Story : धुळ्याच्या एका शेतकऱ्याच्या मुलीची मनीषा आव्हाळे (IAS Manisha Avale) यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांनी नुकत्याच उल्हासनगरच्या आयुक्तपदी नियुक्ती मिळवली आहे, ही बाब त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची उपलब्धी आहे. मनीषा यांच्या जीवनातील ही यशोगाथा त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक अडचणींतून, आणि कठीण परिस्थितींतून मार्ग काढून यश मिळवण्याची आहे.

मनीषा आव्हाळे यांनी पुण्यात बोर्डिंग शाळेत चौथीनंतरचे शिक्षण घेतले आणि नंतर एलएलबी पदवी प्राप्त केली. त्यांचे वडील त्यांना यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला पाठवले. दिल्लीत असताना, त्यांच्या वडिलांना प्रिलियम्सचा निकाल लागला आणि त्यांना कळाले की त्यांच्या आईलाही ब्रेस्ट कॅन्सर आहे. या कठीण परिस्थितीतही मनीषा यांनी हार मानली नाही.

मनीषा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत ८३३ रँक मिळवली. त्यांचे वडील खूप आजारी होते आणि त्यांना पुण्यात उपचारासाठी आणले होते. ते दोन महिने आयसीयूमध्ये होते. या काळातच त्यांच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला, परंतु मनीषा यांनी तो निकाल ८ दिवसांनी बघितला. मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी फक्त एक महिना अभ्यास केला होता.

परीक्षेच्या तयारीदरम्यान मनीषा यांना नेहमी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागायचे, तरीही त्यांनी मुलाखतीची तयारी केली आणि पहिल्या प्रयत्नातच यश मिळवले. त्यांचे इंडियन रेल्वे अकाउंट सर्विसमध्ये सिलेक्शन झाले. मनीषा यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते, म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि ३३ वी रँक मिळवली.

मनीषा आव्हाळे यांनी कितीही खडतर परिस्थिती असली तरी त्यावर मात कशी करायची हे दाखवून दिले आहे. त्यांची ही प्रेरणादायी कहाणी अनेकांना मार्गदर्शन देणारी आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts