बिश्नोई समाजाच्या पहिल्या IAS अधिकारी: परीने 23 व्या वर्षी केली UPSC क्रॅक
![pari bishnoi](https://missionmpsc.com/wp-content/uploads/2025/02/Pari-Bishnoi-780x470.jpg)
राजस्थानच्या (Rajsthan) अजमेरमध्ये (Ajmer) जन्माल आलेल्या परी बिश्नोई (IAS Pari Bishnoi) यांनी त्यांच्या जिद्द आणि मेहनतीच्या बळावर एक अनोखा इतिहास रचला आहे. 26 फेब्रुवारी 1996 रोजी जन्मलेल्या परी बिश्नोई या बिश्नोई समाजाच्या पहिल्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील मनीराम बिश्नोई वकील असून, आई सुशीला बिश्नोई पोलिस अधिकारी आहेत.
परी बिश्नोई यांनी फक्त 23 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली, ज्यामध्ये त्यांनी ऑल इंडिया रँक 30 प्राप्त केली. त्यांच्या यशाची कहाणी प्रेरणादायी आहे आणि अनेक तरुणांना मार्गदर्शन देते.
परी बिश्नोई यांनी अजमेरच्या सेंट मेरीज कॉन्वेंट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. 12वीत असतानाच त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचे ठरवले होते. दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात ग्रॅज्युएशन करून, त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. दोन वेळा अपयश आले तरीही, परी बिश्नोई यांनी हार मानली नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.
परी बिश्नोई यांच्या यशाची कहाणी ही केवळ त्यांच्या मेहनतीची आणि धैर्याची आहे. त्यांनी सुरुवातीला आलेल्या अडचणींवर मात करून आपले स्वप्न पूर्ण केले आहे.