UPSC IAS Success Story ग्रामीण भागातील मुले देखील प्रशासकीय अधिकारी होऊ शकतात. याचे उदाहरण, रोशन केवलसिंग कच्छवा रा. वरखेडे ता. चाळीसगाव येथील युपीएसपीत यश संपादन करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.रोशन याची कहाणी ही ग्रामीण भागातील तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे, यात शंका नाही. दुसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली ग्रामीण भागातील तरुण सुध्दा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षेत यश संपादन करु शकतात हेच रोशन याने या यशातून सर्वांना दाखवून दिलं आहे.
रोशन कच्छवा याचे वडील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या धामणगाव येथील आश्रमशाळेत क्लर्क म्हणून नोकरीला आहेत. रोशन याने दहावीच्या परिक्षेत त्याला ९४ टक्के गुण मिळवले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोशन याने पुण्याला इंजिनिअरींगला प्रवेश घेतला. मात्र इंजिनिअरींगमध्ये त्याचे मन काही रमले नाही.
त्याने इंजिनिअरींगचे शिक्षण अर्ध्यावर सोडून नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात बीएसाठी प्रवेश घेतला.अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर रोशन याने पदवी करत केंद्रीय आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास करण्याचा घेतलेला निर्णय हा त्याच्या कुटुंबासह नातेवाईक तसेच मित्र परिवाराला अचंबित करणारा असाच होता. मात्र, खडतर परिस्थिती अन् असंख्य अडचणींचा सामना करत रोशन याने त्याचा घेतलेला निर्णय हा सार्थ करुन आभाळाला ठेंगण केलं आहे.
रोशनच्या आजोबांना वाटायचे की आपल्या नातवाने लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण व्हावी. यावेळी रोशन लहान होता, त्यानंतर आजोबांचा निधन झाल्यानंतर, रोशन याला आजोबांचे स्वप्न लक्षात होते, त्यामुळे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोशन याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोशन याने अभ्यास करत जीवापाड मेहनत रोशन याने केली.रोशन आपल्या नावाप्रमाणे सार्थ कामगिरी करत देशभरातून ९३३ विद्यार्थ्यांमध्ये ६२० वी रँक मिळवून त्यांन आई वडिलांसह त्याच्या गावाचं नाव रोशन केलं आहे.