मिठाई विक्रेत्याचा मुलगा झाला आयएएस अधिकारी !
UPSC IAS Success Story : जेव्हा एखाद्या सामान्य कुटुंबात जडणघडण झालेला मुलगा देशाच्या सर्वोच्च सेवेत रुजू होतो… तेव्हा अनेकांसाठी हा प्रेरणादायी प्रवास बनतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सौरभ स्वामी. हरियाणातील चरखी दादरी येथे एका सामान्य कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील रोहतक चौकात मिठाई आणि कुल्फी विकायचे. सौरभ लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते.
दादरी येथील एपीजे शाळेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते दिल्लीला आले. येथे त्यांनी भारतीय विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक केले. त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की मुलाने आय.ए.एस अधिकारी व्हावे. त्यासाठी त्यांनी युपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
सौरभ स्वामी यांनी या तीन महिन्यांत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यासाठी ते दिल्लीला गेले होते. तेथे, कोचिंग आणि अभ्यासाद्वारे, त्याने २०२४ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये १४९वा रँक मिळाला. त्यांनी केवळ आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले नाही तर संपूर्ण कुटुंबाचं नाव मोठं केलं आहे.मिठाई विक्रेत्याचा मुलगा एके दिवशी देशाच्या सर्वोच्च सेवेत रुजू होईल, याची कोणाला कल्पनाही नव्हती. पण त्यांने हे खरे करून दाखवले आहे.