⁠  ⁠

वेळप्रसंगी अंडी विकून उदरनिर्वाह केला, पण चिकाटीने बनले IAS

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

UPSC IAS Success Story : खरंतर, स्पर्धा परीक्षा म्हटलं की सातत्याने अभ्यास आणि जिद्दीची एक निराळी कहाणी आली. बिहारमधील मनोजकुमार राय यांनी अंडी विकून उदरनिर्वाह केले. पण स्वप्नांसाठी धडपडत राहिले. तरीही त्यांनी जिद्द आणि चिकाटीने मेहनत सुरूच ठेवली. अखेर त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्याने UPSC उत्तीर्ण केली.

ही संपूर्ण गावातील आणि कष्टकरी मुलांसाठी प्रेरणादायी बाब आहे. बिहारमधील सुपौल नावाच्या एका लहानशा गावात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मनोजने लहानपणापासूनच अत्यंत गरिबी आणि त्रास सहन केला होता. सर्व अडथळ्यांना न जुमानता त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर ते आपल्या कुटुंबासाठी उदरनिर्वाहासाठी दिल्लीत स्थलांतरित झाले.

खेडेगावातून आलेल्या मनोजला मोठ्या शहरात जुळवून घेणं त्रासदायक होतं. परंतू, त्याने जिद्दी – धाडस सोडले नाही आणि अनेक नोकऱ्यांमध्ये काम केले. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, त्याने अंडी आणि भाजीची गाडी उघडली. पैसे कमावण्यासाठी त्याने कार्यालयातील मजलेही साफ केले. त्यांनी डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम केले आणि प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात वस्तूंचा पुरवठा केला.

तेव्हाच त्यांच्या आयुष्याला एक महत्त्वाचं वळण लागलं, जेव्हा ते अशा विद्यार्थ्यांशी भेटले ज्यांनी त्यांना ग्रॅज्युएशन पूर्ण करून आयएएस अधिकारी बनण्याची प्रेरणा दिली. तो इतका प्रेरित झाला की त्याने श्री अरबिंदो कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि अंडी, भाज्या विकत आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत बी.ए शिक्षण पूर्ण केले. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली. मात्र, मर्यादित साधनसामग्री आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांना तयारीच्या प्रवासात नको त्या अडचणींमधून जावे लागले. शालेय विद्यार्थ्यांसाठी खाजगी कोचिंग क्लासेस घेत असताना त्याने पाटण्याला परत जाण्याचा आणि त्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

२००५ मध्ये त्याने पहिला प्रयत्न केला, पण अयशस्वी झाल्याचे दुःख झाले. त्याचा दुसरा प्रयत्नही फलदायी ठरला नाही कारण इंग्रजी विषयाचा प्रोब्लेम होता होता. तिसर्‍या प्रयत्नात, तो प्रिलिम्स क्लिअर करण्यात यशस्वी झाला, पण तो मेनमध्ये अपयशी. त्याने चौथा प्रयत्न केला तोपर्यंत ते ३० वर्षांचे झाले होते. प्रिलिम्सचा अभ्यास करण्याऐवजी त्याने प्रथम मुख्य अभ्यासक्रम पूर्ण केला. असे करून त्याने प्रिलिम्सचा ८०% अभ्यासक्रम पूर्ण केला. इयत्ता सहावी ते बारावीची NCERT ची पुस्तकेही त्यांनी मनापासून वाचली. त्यामुळे सामान्य अध्ययनासाठी आवश्यक असलेल्या त्याच्या मूलभूत संकल्पनांना बळकटी मिळाली. अखेर, मनोजने शेवटी २०१० मध्ये AIR-८७० सह UPSC परीक्षा क्रॅक केली. आय.ए.एस अधिकारी झाले. त्यांच्या संघर्षातून प्रेरित होऊन मनोजने त्यांच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे आणि ते करत आहेत.

Share This Article