UPSC IAS Success Story : लहानपणापासून तिने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्धार केला. जेव्हा तिने IAS अधिकारी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती दहावीत होती. सिव्हिल सर्व्हंट होण्याच्या स्वप्नाने ती इतकी प्रेरित झाली की तिने कॉलेजमध्ये जाण्यापूर्वीच यूपीएससीची तयारी सुरू केली. तिची आवड आणि जिद्द एवढी होती की तिने वयाच्या २१ व्या वर्षी युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा (CSE) पास केली.
सुरभी यांचे वडील मैहर सत्र न्यायालयात वकील असून त्यांची आई सुशीला शिक्षिका आहे. त्यांनी सुरभीला पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवलं. शिक्षणासाठी शहरात गेलेली सुरभी गावातली पहिली मुलगी होती. सुरभी यांनी इंजिनीयरिंगची प्रवेश परीक्षा दिली. त्यात त्यांना अतिशय चांगले गुण मिळाले. त्यामुळे सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. सुरभी यांनी भोपाळमधल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समधून इंजिनीयरिंग केलं.
युनिव्हर्सिटी टॉपर आणि गोल्ड मेडलिस्ट सुरभी गौतम हिने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये बसण्यापूर्वी अनेक परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. सुरभी गौतम यांनी BARC मध्ये अणुशास्त्रज्ञ म्हणून एक वर्ष काम केले होते. तिने GATE, ISRO, SAIL, MPPSC PCS, SSC CGL, दिल्ली पोलिस आणि FCI सारख्या परीक्षा देखील उत्तीर्ण केल्या आहेत.
चांगले गुण मिळवूनही तिला कॉलेजमध्ये इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे तिला अनेकदा टिंगलटवाळी करण्यात आली. सुरभीला माहित होते की, ती इंग्रजी भाषा शिकली तर ती आणखी चांगली पोझिशन मिळवू शकते. त्यामुळे, ती दररोज इंग्रजीमध्ये नवीन शब्द शिकू लागली. तिने स्वतःवर मेहनत घेतली आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत राहिली. २०१३ मध्ये, तिने IES परीक्षेत AIR-1 आणि २०१६ मध्ये युपीएससी परीक्षेत AIR-५० मिळवले. सुरभीने हे सिद्ध केले आहे की जर तुमच्यात एखादी गोष्ट साध्य करण्याची इच्छा असेल तर कोणताही अडथळा तुम्हाला ते साध्य करण्यापासून रोखू शकत नाही.